होमपेज › Solapur › सोलापुरात राष्‍ट्रवादी-एमआयएममध्ये राडा; १७ जणांवर गुन्‍हा

डॉल्बी लावण्यावरून राष्‍ट्रवादी-एमआयएममध्ये राडा

Published On: Dec 04 2017 12:30PM | Last Updated: Dec 04 2017 1:30PM

बुकमार्क करा

सोलापूर : पुढारी ऑनलाईन

पैगंबर जयंतीदिनी रात्री साईनाथनगर भाग २ येथे डॉल्बी लावण्याच्या कारणावरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख व राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारुण सय्यद यांच्यासह १५ जणांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जावीद मुस्तफा कल्याणी (वय २०, रा. अक्कलकोट रोड एमआयडीसी, साईनाथ नगर भाग २, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन वहाब सय्यद, शोएब सय्यद, हारुण सय्यद व त्यांची दोन मुले, अनिस सय्यद, मोहसिन मुजावर, महिबुब मुजावर व इतर काही जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोहसीन कासिम मुजावर (वय २८, रा. साईनाथ नगर भाग २, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन तौफिक शेख, ईरफान फनिबंद, जाविद कल्याणी, मोहसीन कल्याणी, शाकिर सगरी, त्याचे भाऊ व इतर काही जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैगंबर जयंतीनिमित्त शनिवारी रात्री साईनाथ नगरात पोलिसांनी येऊन डॉल्बी बंद करण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरुन व पोलिसांना सांगितले म्हणून वहाब सय्यद, शोएब सय्यद, हारुण सय्यद यांनी येऊन जावीद कल्याणी यास लाकडाने, हत्याराने मारहाण करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक करंडे तपास करीत आहेत.

तर मोहसीन मुजावर याच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री डॉल्बी लावण्याच्या कारणावरुन तौफिक शेख व इतरांनी मुजावर यास शिवीगाळ करुन तुमचा बाप येऊ द्या, तुम्हांला दाखवितो असे म्हणून हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक राठोड तपास करीत आहेत.