Sat, Feb 16, 2019 19:17होमपेज › Solapur › पंढरपुरात वीज वितरणचे दोन अभियंते लाच लुचपतच्या जाळ्यात

पंढरपुरात वीज वितरणचे दोन अभियंते लाच लुचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 30 2018 5:12PM | Last Updated: Jan 30 2018 5:12PMपंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे दोन अभियंते पंढरपूर येथे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकरणी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही अभियंत्यांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पंढरपूर शहर उपविभागात सहायक अभियंता असलेले जयप्रकाश कदम यास वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी १ हजार रुपयांची तर ग्रामीण विभागात करकंब येथे शाखा अभियंता असलेले संतोष सोनवणे हे दुसऱ्या एका प्रकरणी लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने पकडले आहेत. दोन्ही अभियंत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. एकाच दिवशी वीज वितरणचे दोन अभियंते वेगवेगळ्या प्रकरणी लाच घेताना सापडल्यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.