Tue, Apr 23, 2019 02:02होमपेज › Solapur › सोलापूर : बनावट नोटा छपाई प्रकरणी दोघांना अटक

सोलापूर : बनावट नोटा छपाई प्रकरणी दोघांना अटक

Published On: Jan 25 2018 8:56PM | Last Updated: Jan 25 2018 9:09PMमाढा : वार्ताहर 

माढा तालुक्यातील टाकळी येथे बनावट नोटा छपाईप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुणे व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून प्रिंटर आणि पन्‍नास रुपयांच्या दहा हजाराच्या नोटाही जप्‍त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, माढा तालुक्यातील टाकळी येथे काही जण बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  पुणे ग्रामीणमधील बारामतीचे पोलिस उपअधीक्षक व सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. याठिकाणी बनावट नोटा छपाई करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी वसिष्ठ पुंडलिक जाधव व अन्य एकास ताब्यात घेतले.

संशयितास ताब्यात घेत असताना त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.