Mon, Apr 22, 2019 06:14होमपेज › Solapur › Photo Gallery : सहकार पंढरीत रंगला रिंगण सोहळा

सहकार पंढरीत रंगला रिंगण सोहळा (Photos)

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 8:29AMअकलूज : रवी शिरढोणे 

टाळ मृदुंग वीणा,डोई तुळस नी माळा,
अश्‍वासह धावे, वैष्णवांचा मेळा रे!
रिंगणी घुमतो, विठूनामाचा जयघोष,
अनुपम्य हा सुख सोहळा रे !!..
.
विठूनामाचा जयघोष करीत भक्‍तिरसात तल्लीन झालेल्या लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने जगद‍्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत  बुधवारी (दि. 18) सकाळी 8.30 वाजता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूजमध्ये प्रवेश केला. तोफांच्या सलामीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचे तिसरे व जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पार पडले. यावेळी लाखो भाविकांनी हा नयनरम्य सोहळा अनुभवला.

सराटी (जि. पुणे) येथील मुक्‍कामानंतर सकाळी 7.10 वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर  8.30 वाजता नदीवरील पूल ओलांडून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. आकाशात झालेल्या  ढगांच्या गर्दीत विठुनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत होता. टाळ-मृदुंगाच्या निनादाने सहकार पंढरी अकलूजची सकाळ भक्‍तिमय झाली होती. दोन दिवसांच्या रिमझीम सरींनी उघडीप दिल्यानंतर पालखीचे आगमन अल्हाददायक झाले. नीरा नदी पुलावर पालखीचे स्वागत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. यावेळी  जिल्हाधिकारी राजेंद्र  भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस, प्रांताधिकारी शमा पवार, पं.स. सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, पं.स. सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, तहसीलदार बाई माने आदी उपस्थित होते.

Image may contain: 3 people, flower

अकलूजच्या गांधी चौकात ग्रामपंचायतीच्या वतीने खा. विजयसिंह मोहिते-पाटील, सौ.नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील,  सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जि.प.सदस्या सौ.शितलदेवी  मोहिते-पाटील, उपसरपंच धनंजयभाऊ देशमुख, माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील, सर्व आजी माजी सदस्य, ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करीत फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. गाव प्रदक्षिणा करून विठ्ठल मंदिरमार्गे पालखी सोहळा सकाळी  साडे दहा वाजता सदुभाऊ चौकात आला. येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्वागत अध्यक्ष जयसिंह मोहिते  पाटील, सौ. सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, जि.प. सदस्या कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे सर्व संचालक उपस्थित होते. रथाने मैदानाला एक फेरी घातली या वेळी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रथाचे सारथ्य केले. पालखी  सदाशिवराव माने विद्यालयाच्या मधोमध  उभारण्यात आलेल्या  मंडपात ठेऊन पालखीची पाद्यपूजा जयसिंह  मोहिते-पाटील व सौ.सुलक्षणादेवी   मोहिते-पाटील या उभयंत्याच्या हस्ते करण्यात आली.

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoor

लाखों भाविकांची उत्सुकता लागलेल्या रिंगण सोहळ्याचा प्रारंभ अश्‍व पूजनाने झाला.देवाचा (बाभुळकरांचा) अश्‍व  व स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या अश्‍वाची पूजा खा.विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील, डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, सौ.उर्वशिराजे मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आली.तत्पूर्वी रिंगणात पताकाधारक, तुळशीधारक, हंडेकरी महिला, विणेकरी, टाळकरी यांनी धावत एक फेरी केली. तर दोन्ही अश्‍वांनी तीन फेर्‍या पूर्ण केल्या.   रिंगणातील माती कपाळाला लावण्यास वैष्णवांनी गर्दी केली.या वेळी पारंपरिक खेळही सादर झाले. मोहिते-पाटील व ग्रामस्थांच्या वतीने पालखीच्या मानकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष  बाळासाहेब मोरे, सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, जालिंदर मोरे आदी उपस्थित होते.   सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखी दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात आली. परिसरातील सामाजिक, सहकारी संस्था, विविध संघटनांनी दिवसभर वैष्णवांना भोजन,अल्पोपहार,चहा,फळे,औषध वाटपाची सुविधा पुरवली. चौकाचौकात दिवसभर भजन,कीर्तन,भारुडांनी रंगत आणली.

Image may contain: 5 people, people standing, wedding, crowd and outdoor

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 333 व्या वर्षांत 330 दिंड्या

Image may contain: 5 people, people smiling, people sitting and outdoor

हा 333 वा सोहळा असून पालखीत 330 दिंड्या आहेत. तर सुमारे साडेतीन लाख वैष्णव आहेत. पालखीच्या रथापुढे 25 आणि मागे 305 दिंड्या आहेत. सव्वातीन टन वजनाचा रथ असून त्याला बैलाच्या जोड्या प्रणव शेळके, माण, मुळशी व बाळासाहेब कड, कुरुली, खेड यांच्या आहेत. फुलांची सजावट राजकुमार केसवड हे रोज पुण्यातून फुले आणून करतात.

Image may contain: 6 people, people smiling

Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 2 people, flower