Wed, Mar 20, 2019 09:15होमपेज › Solapur › नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील जखमी प्रवाशांवर उपचार

नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील जखमी प्रवाशांवर उपचार

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:22PMसोलापूर ः प्रतिनिधी

नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील जखमी चार प्रवाशांवर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवारी रोजच्याप्रमाणे प्रवास करत होती. अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे खिडकीच्या बाजूला बसले होते. काही जण खिडकीच्या तावदानावर हात ठेवून बसले होते. नासीर अली हसन अली सय्यद (वय 43, रा. सांगली), राजेश हरिश्‍चंद्र वगरघडे (44, रा. सौभाग्यनगर, नागपूर), सरिल डॅनियल तिरोडे (62,  राजारामपुरी, कोल्हापूर), बळवंत शिंदे (30, रा. राधानगरी, कोल्हापूर) यांना तुटलेल्या दिशादर्शक पत्र्याचा धक्‍का लागला. त्याला धार असल्याने काही जण जखमी झाले. सलगरे-अरग स्थानकादरम्यान असलेला एक लोखंडी पत्रा धोकादायकरीत्या तुटला होता. रेल्वे एक्स्प्रेस गाडी येताच हा पत्रा त्याला घासू लागला.