Fri, Jun 05, 2020 20:32होमपेज › Solapur › विवाहित महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा

विवाहित महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 9:10PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

शेतातील काम उरकून घरी परत जात असताना विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजुरी (ता. करमाळा) येथे संशयीत आरोपीच्या शेतात घडली आहे. मारुती बापू शिंदे (रा. राजुरी, ता. करमाळा) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

विवाहित महिला शेतकरी बुधवारी सकाळी दहा वाजता स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. दिवसभराचे काम आटोपून शेतातून घरी पायी येत असताना मारुती शिंदे यांनी रस्त्यात असलेल्या स्वतःच्या शेताच्या कडेला ओढत घेऊन गेला. त्याठिकाणी पीडितेवर जबरी अत्याचार केला. त्यावेळी पीडिता घरी कशी आली नाही, हे पाहण्यासाठी पीडितेचा पती जात असताना आरोपी शिंदेने त्याठिकाणाहून पलायन केले. विवाहित महिलेवर जबरी अत्याचार करणे व धमकी याप्रकरणी संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल गोंधे हे करीत आहेत.