होमपेज › Solapur › विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी टोकन पद्धत

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी टोकन पद्धत

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 11:26PMगेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाच्या वतीने क्षेत्र पंढरपूर हे मद्य व मांस विक्रीमुक्‍त असावे, याकरिता शासन दरबारी सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंदिर समितीच्या अध्यक्षांनी शासनदरबारी प्रयत्न करावेत, असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. याकरिता अनेक आंदोलने केलेली असून खा. अमर साबळे यांनीदेखील या कामी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप याबाबतीत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी वारकरी संप्रदायाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनास अधिकृत प्रस्ताव पाठवून श्री क्षेत्र पंढरपूर मद्य व मांस विक्रीमुक्‍त असावे.

पंढरपूर :

शिर्डी देवस्थान व तिरूपती बालाजी देवस्थान यांच्या धर्तीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता आता टोकन पद्धत अवलंबण्यात येणार आहे.  आज क्यू मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याबाबतच्या अ‍ॅक्सेस कार्डचे अनावरण करण्यात आले. टोकन पद्धतीमुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. 

 या निवेदनावर निर्णय देताना आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव त्वरित शासनाला पाठवू, अशा प्रकारचे ठोस आश्‍वासन वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या शिष्टमंडळास अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिले. यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, वा. सं. पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. देवव्रत ऊर्फ राणा महाराज वासकर, विठ्ठल महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, विठ्ठल महाराज पैठणकर, गणेश महाराज कराडकर, शाम म. उखळीकर, रामकृष्ण वीर महाराज, नागेश म. बागडे इ. उपस्थित होते.

मंदिर समितीची बैठक  आज, मंगळवारी अध्यक्ष  डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य रामचंद्र शिवाजी कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम,  सचिन अधटराव, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे,  आ. सुजितसिंह मानसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख (जळगांवकर), अ‍ॅड. माधवी निगडे,  प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखाधिकारी रविंद्र वाळुजकर उपस्थित होते.
  
शिर्डी देवस्थान व तिरूपती बालाजी देवस्थान यांच्या धर्तीवर टोकन पध्दत अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक्सेस कार्डचे अनावरणी करण्यात आले. तसेच सेवाभावी तत्वावर उभारण्यात आलेल्या 4 चेंजिंग रुमचे  उद्घाटन करण्यात आले.   दि.16/05/2018 ते 13/06/2018 या कालावधीत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे.  मंदिर व मंदिर परिसरात माहितीचे व दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून  चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा मार्ग आदी ठिकाणी कचरा साठविण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कचरा कुंडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन भक्‍तनिवास येथील गाळे लिलाव प्रक्रिया राबवून भाडेतत्वावर देण्याचे ठरले. शहर व परिसरातील मंदिर समितीच्या मालकीच्या मंदिरांचे सुशोभिकरण करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्ट नियुक्‍त करण्यास मान्यता देण्यात आली. 

संभाजी शिंदे,  आ. सुजितसिंह मानसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख (जळगांवकर), अ‍ॅड. माधवी निगडे,  प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखाधिकारी रविंद्र वाळुजकर उपस्थित होते.  शिर्डी देवस्थान व तिरूपती बालाजी देवस्थान यांच्या धर्तीवर टोकन पध्दत अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक्सेस कार्डचे अनावरणी करण्यात आले. तसेच सेवाभावी तत्वावर उभारण्यात आलेल्या 4 चेंजिंग रुमचे  उद्घाटन करण्यात आले.  दि.16/05/2018 ते 13/06/2018 या कालावधीत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे.  मंदिर व मंदिर परिसरात माहितीचे व दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून  चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा मार्ग आदी ठिकाणी कचरा साठविण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कचरा कुंडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन भक्‍तनिवास येथील गाळे लिलाव प्रक्रिया राबवून भाडेतत्वावर देण्याचे ठरले. शहर व परिसरातील मंदिर समितीच्या मालकीच्या मंदिरांचे सुशोभिकरण करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्ट नियुक्‍त करण्यास मान्यता देण्यात आली. 

Tags : Token System, Vitthal Rukmini Darshan, Pandhrpur