Thu, Feb 21, 2019 09:23होमपेज › Solapur › मुदतवाढीसाठी गाळेधारक व्यापार्‍यांचा आज मोर्चा

मुदतवाढीसाठी गाळेधारक व्यापार्‍यांचा आज मोर्चा

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 11:05PMसोलापूर ः प्रतिनिधी 

व्यापार्‍यांना भाडेतत्त्वावरील महापालिकेच्या गाळ्यांची मुदत संपली असली तरी भाडेवाढ घेऊन विद्यमान गाळेधारक व्यापार्‍यांना गाळे द्यावेत, यासाठी गाळेधारक संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

सकाळी दहाच्या सुमारास मेकॅनिक चौक येथून हा मोर्चा निघणार असून सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महापालिका मुख्य प्रवेशद्वार या मार्गे एलआयसी भवनजवळच्या बोळातील महापालिका गेट समोर हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चानंतर व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ आयुक्तांना पुन्हा एकदा निवेदन देणार असून त्यानंतर रस्त्यावर सभा होणार असल्याची माहिती गाळेधारक  व्यापारी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी दिली.