Sun, Apr 21, 2019 14:04होमपेज › Solapur › सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला

सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:18PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

दारुसाठी पैसे  मागून त्रास दिल्याच्या कारणावरुन सख्ख्या भावाचा अपहरण करुन खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम.पाटील यांनी फेटाळून लावला.शाकिर शकुर शेख (वय 41, रा. शिवगंगा नगर), तारीक उर्फ परवेज ताजोद्दीन शेख (वय 32) व साजीद शकुर शेख (दोघे रा. सिध्देश्‍वर नगर मजरेवाडी) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिस शेख असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. 

अनिस यास दारुचे व्यसन होते. तो आरोपीकडे दारुसाठी नेहमी पैशांची मागणी करत होता. पैसे न मिळाल्यास मयत अनिस हा आरोपींना शिवीगाळ व मारहाण करत होता. तो 20 मार्च 2017 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला होता.  तो परत आला नसल्याने अनिसची पत्नी रुकय्या यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपींनी अनिसचे अपहरण करुन, नंतर त्याला मारहाण करुन त्याचा खून करुन त्याचा मृतदेह कर्नाटक हद्दीत नेऊन टाकल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले होते.या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड.जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष न्हावकर, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. मिलिंद थोबडे हे काम पाहत आहेत.