Thu, Jul 18, 2019 16:39होमपेज › Solapur › पुणे-दौंड मार्गावर महिनाभर तीन तासांचा ब्लॉक

पुणे-दौंड मार्गावर महिनाभर तीन तासांचा ब्लॉक

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:48PMसोलापूर : प्रतिनिधी

पुणे ते दौंड सेक्शन दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने 1 मार्च ते 31 मार्च या काळात रोज तीन तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या धिम्या गतीने धावणार आहेत. दौंड ते पुणे या मार्गावर ट्रॅकच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल एक महिनाभर 1 मार्च ते 31 मार्च याकाळात इंटरग्रेटेड ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे पुणे ते दौंड (71407), दौंड ते पुणे (71408), बारामती-पुणे (51452) या गाड्या पुणे- दौंड मार्गावर धावणार नाहीत. तसेच अमरावती-पुणे 50 मिनिट उशिरा धावणार आहे. हैदराबाद-पुणे (17014) 1 तास 50 मिनिटे उशिरा धावणार आहे. अमरावती-पुणे (11406) 1 तास 50 मिनिटे धावणार आहे. हैदराबाद-पुणे (17014) 1 तास 15 मिनिटे उशिरा धावणार आहे. जम्मूतवी-पुणे (11078) 10 मिनिटे उशिरा धावणार असल्याची माहिती सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने  देण्यात आली.