होमपेज › Solapur › पैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

पैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Published On: May 05 2018 11:23PM | Last Updated: May 05 2018 9:45PM



सोलापूर : प्रतिनिधी

पैसे घेऊन चारचाकी फोक्स वॅगन कंपनीची गाडी देण्यास टाळाटाळ करुन 4 लाख रुपयांची  फसवणूक   केल्याप्रकरणी कोंडीच्या एबीएस व्हिल्स प्रा. लि. या शोरूमसह तिघांविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्शद आयुब शेख (रा. मंगळवार बाजार, सोलापूर), अफसर खान (रा. मंगळवार पेठ, सोलापूर) आणि एबीएस व्हिल्स प्रा. लि. (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दयानंद जनार्दन कारमपुरी (वय 44, रा. जयलक्ष्मी सोसायटी, मित्रनगर, शेळगी, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दयानंद  कारमपुरी   यांनी  8 जानेवारी 2017 रोजी  कोंडी येथील एबीएस व्हिल्स प्रा. लि. या कंपनीचे पार्टनर अर्शद शेख, अफसर खान यांच्याकडे नवीन चारचाकी फोक्स वॅगन  गाडी घेण्यासाठी 4 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स भरून  चारचाकी  गाडी बुक  केली होती. पैसे भरून अनेक महिने उलटून गेल्यानंतर शेख व खान हे दोघेही कारमपुरी यांना गाडी देण्याचे टाळाटाळ करु लागले. त्यामुळे कारमपुरी यांनी गाडी देत नसाल तर माझे अ‍ॅडव्हान्स भरलेली रक्‍कम तरी परत द्या म्हणून शेख व खान यांच्याकडे तगादा लावला. त्यावेळी शेख व खान यांनी अ‍ॅडव्हान्स घेतलेले 4 लाख रुपये परत न देता कारमपुरी यांची फसवणूक केली म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे तपास करीत आहेत.
25 हजारांच्या इलेक्ट्रिकल साहित्याची चोरी

मोटे वस्ती येथील नरवीर तानाजी चौकातील विश्‍वास मच्छिंद्र जुगदार (वय 37, रा.  बुधवार पेठ, सोलापूर) यांच्या गोडावूनमधून बिग डिपर एलपी मॉडेल 2 या कंपनीचे 10 एलईडी फोकस शुभम महादेव शिंदे (रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर) याने चोरुन नेल्याप्रकरणी  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून हवालदार वाल्मिकी तपास करीत आहेत. वृध्देला मारहाण करणार्‍या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

शिवीगाळ करुन वृध्देला मारहाण करणार्‍या महिलेविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वती बसवण्णा धिवारे (वय 80, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) या वृध्द महिलेच्या फिर्यादीवरुन सुषमा रविंद्र धिवारे (वय 34, रा. विद्यानगर, शेळगी) या  महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.