Tue, Jan 22, 2019 11:37होमपेज › Solapur › साडेतीन लाख विद्यार्थी पोषण आहाराविना

साडेतीन लाख विद्यार्थी पोषण आहाराविना

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 9:05PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अनुदान अधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे गेले. वर्षभर  अडकवून ठेवल्याने साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शाळेतील भात शिजवून देण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवानंद भरले यांनी सांगितले. शासनाने शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठी इंधन, भाजीपाला खर्चासाठी अनुदान दिले जाते. ते सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडे जून 2017 मध्येच येऊन पडले असताना जिल्हा प्रशासनातील कारकून व अधिकारी मंडळी यांनी दुर्लक्ष केल्याने याचे त्यांना गांभीर्य नसल्याने भात शिजवून देण्यासाठीचे जूनपासूनचे अनुदान  दिले नाही.

यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून स्वयंपाकीण व मदतनीस मानधन मिळण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती.  गेल्या आठवड्यातच डिसेंबरअखेरपर्यंत अनुदान देण्याचे निवेदन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा सर्व मुख्याध्यापकांना त्रास होतो आहे. गेले वर्षभर शिक्षक पदरमोड करून इंधन, भाजीपाला पुरवत आहेत. पण यापुढेही मुख्याध्यापक हे बंद करीत असल्याने  शिक्षक संघटनांनी शाळेतील भात शिजवून देण्याचे काम बंद ठेवत असल्याबाबत निवेदन शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, शिक्षणाधिकारी संजयकुमार  राठोड यांना देण्यात आला आहे. यावेळी राजाराम चव्हाण, अशोकराव कुलकर्णी, संजय ननावरे, अजित खरात, प्रसिध्दीप्रमुख सूर्यकांत हत्तुरे आदी उपस्थित होते.