Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Solapur › मोटरसायकल रॅलीत हजारोंचा सहभाग

मोटरसायकल रॅलीत हजारोंचा सहभाग

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 11:08PM

बुकमार्क करा
अकलूज: तालूका प्रतीनिधी

माळशिरस तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी हजारों मोटारसायकलसह अकलूज व शंकरनगर परिसरातून मोटारसायकल रॅली काढून सहकार महर्षींना अभिवादन केले. या रलीचे नेतृत्त्व खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.  शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे रॅलीचा प्रारंभ खा.विजयसिंह मोहिते-पाटील व सौ,नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते सहाकार महर्षी व कै.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यायाच्या मैदानावर  तालुक्यातून आलेल्या हजारों मोटारसायकलचे शिस्तबद्ध नियोजन केले होते.  

शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील  यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दुपारी 3 वाजता प्रारंभ झाला. दुचाकीवर जन्शमताब्दीचे झेंडे लावले होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन.सी.सी. पथकाने दुचाकीवर सहकार महर्षींची प्रतिमा असलेल्या चित्ररथासमोर रॅलीत सहभाग घेतला.  महाविद्यालयापासून प्रतापसिंह चौक, आझाद चौक, गांधी चौक, सदूभाऊ चौक मार्गे शंकरनगरच्या सहकार महमहषीर्र् इंजिनियरिंग कॉलेज येथे समारोप करण्यात आला.

दुचाकीवर रॅलीमध्ये बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील ,  अर्जुनसिंह मोहिते-पाटील,  सरपंच शिवतेजसिंह   मोहिते-पाटील, जि.प.सदस्या कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी  मोहिते-पाटील, पं.स.सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील सह मोहिते-पाटील  परिवारातील सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,युवा कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारमहषीर्र् इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे प्रत्येक दुचाकीस्वारास झाडाचे रोप देऊन रॅलीचा समारोप  करण्यात आला. दुपारी 3 वाजता सुरू झालेली रॅलीचा समारोप 4 वाजता झाला.