Tue, Mar 19, 2019 05:16होमपेज › Solapur › भारतात चार कोटी जनता थॅलेसेमियाग्रस्त

भारतात चार कोटी जनता थॅलेसेमियाग्रस्त

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:42PMसोलापूर : इरफान शेख

भारतामध्ये चार कोटींपर्यंत जनता थॅलेसेमिया आजारने ग्रस्त आहे. दरवर्षी हजारांहून बालके थॅलेसेमिया मेजर हे आजार घेऊन जन्म घेत आहेत.सोलापुरातसुध्दा थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त असलेल्या 250 रुग्णांची नोंद रक्तपेढीमध्ये झालेली आहे. आई व वडिलांच्या रक्तामध्ये थॅलेसेमिया आजाराची वाहतका असेल तर पुढच्या पिढीलासुध्दा थॅलेसेमिया मेजर हा आजार होतो. 
थॅलेसेमिया हा एकप्रकारचा अ‍ॅनेमिया आहे. थॅलेसेमिया आजाराची वाहकता असललेली व्यक्ती सर्वसाधारण आयुष्य जगत असते.परंतु जेव्हा दोन थॅलेसेमिया वाहकता असलेल्या स्त्री-पुरुषाचे लग्न होते  तेव्हा त्यांच्या होणार्‍या बालकांमध्ये थॅलेसेमिया मेजर हा आजार निर्माण होतो. थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त व्यक्तीला दर 20 ते 25 दिवसांनी शरीरातील पूर्ण रक्त बदलावे लागते.
थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त रुग्ण आयुष्यभर रक्तसंक्रमणावर अवलंबून असतो. थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त रुग्णांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढत जाते व ते कमी करण्यासाठी आयर्न-चिलेशन थेरेपी घ्यावी लागते. बदललेल्या लोहप्रमाणामुळे लिव्हर, प्लिहा, थॉयरॉईड यासारख्या अवयवांवर परिणाम  होऊ लागतो. शरीराची वाढ खुंटते, हाडे विकृत होतात.प्लिहा मोठी होत जाते. बर्‍याचदा ती काढण्यासाटी शस्त्रक्रिया करावी लागते. या सर्व प्रकारांमुळे आयुष्यमान कमी होते.

थॅलेसेमिया मेजर या आजाराला एकच उपाय म्हणजे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ होय जे अत्यंत खर्चिक आहे. एखाद्या गरीब रुग्णास परवडण्यासारखे नाही. थॅलेसेमिया आजाराची  वाहकता  शोधून काढता येऊ शकते. ‘हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस’ या तपासणीद्वारे अत्यंत अल्पदरात निदान होऊ शकते.

प्रत्येक विवाहपूर्व मुलाने व मुलीने विवाहाअगोदर ही तपासणी करुन थॅलेसेमिया मायनर आजाराची तपासणी करुन घ्यावी. ज्यामुळे पुढच्या पिढीला थॅलेसेमिया मेजर हा आजार होऊ शकणार नाही. दोन थॅलेसेमिया वाहकता असलेल्या जोडप्यांचे विवाह रोखले पाहिजेत. प्रसूतीपूर्व तपासणी (एएनसी स्क्रनिंग) हा एक मार्ग आहे.प्रत्येक गरोदरस्त्रीची गर्भधारणेच्या पहिल्या दोन ते अडीच महिन्यात ही तपासणी आवश्यक आहे. जर गरोदर स्त्रीच्या रक्तामध्ये थॅलेसेमिया वाहकता असेल व पतीच्या रक्तामध्ये वाहकता असेल तर ही सर्व तपासणी करुन गर्भवती स्त्रीवर योग्य औषधोपचार करुन थॅलेसेमिया मेजर आजार टाळता येऊ शकतो. 

थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त रुग्णांस दर दोन आठवड्यांनी किंवा एक महिन्याने रक्तपुरवठा न केल्यास मृत्यू अटळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.