Mon, Jul 22, 2019 02:54होमपेज › Solapur › आषाढी यात्रेसाठी महामंडळाच्या ३८०० बसेस उपलब्ध

आषाढी यात्रेसाठी महामंडळाच्या ३८०० बसेस उपलब्ध

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 8:56PMपंढरपूर : अरुण बाबर

आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यंदा 3800 बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पंढरपुरातील यात्रेसाठी लाखो वारकरी येतात. वारकरी राज्यभरातून येण्यासाठी आणि परत गावी जाण्यासाठी महामंडळाने ही सुविधा उपलब्ध केली आली आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी पंढरपुरात येतात. त्यांच्या येण्या-जाण्याची सोय महामंडळाने केलेली आहे. त्याचबरोबर भाविकांनी चार व सहा दिवसांच्या पासेसची सोय देखील उपलब्ध केला आहे. ग्रूपबुकिंग ही राज्यातील कोणत्याही बस स्थानकात करता येईल. प्रत्येक वर्षी पंढरपूर मध्ये वर्षी तीन बस स्थानके असतात. या वेळेपासून सांगोलारोड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथून येणार्‍या गाड्या थांबतील.

तर विदर्भ, मराठवाडा ह्या गाड्यांचे बस स्थानक  तीनरस्ता येथे भीमाबस स्थानक असेल. पुणे, मुंबई, सातार्‍याहून येणार्‍या बससाठी  शहरातील चंद्रभागा बस स्थानक येथे असणार आहे. नाशिक, नगर, जळगाव, ह्या गाड्यांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बस स्थानक असेल. अशी चार दिशांना चार बस स्थानके उभारण्यात आली आहेत. यामध्ये चौकशी विभाग, आरोग्य विभाग, पोलिस बंदोबस्त, आणि हे चारही बसस्थानके हे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असणार आहेत. भाविकांना राज्यभरातून येण्यासाठी आणि परत गावी जाण्यासाठी महामंडळाने ही सुविधा उपलब्ध   करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

यामध्ये चारही बसस्थानकांमध्ये चौकशी विभाग, आरोग्य विभाग, पोलिस बंदोबस्त, आणि हे चारही बसस्थानके हे सीसीटिव्ही नियंत्रणाखाली असणार आहेत. ग्रूपबुकिंगची सोय राज्यभरातील सर्व बसस्थानकांमध्ये असणार आहे. तसेच पंढरपूर येथील चारही बसस्थानकांमध्ये ही सोय 24 तास उपलब्ध राहणार आहे.

भाविकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांच्या बसनेच जास्तीत जास्त प्रवास करावा. चार ते सहा दिवसांच्या पासेसचा लाभ घ्यावा. वाखरी येथे होणार्‍या रिंगन सोहळ्यासाठी 125 बसेस असणार आहेत. यात्रेमध्ये भाविकांना बस स्थानके कोणत्या ठिकाणी आहेत. त्याची माहिती देण्यासाठी 300 प्रवासी मित्र असणार आहेत.  -रमाकांत गायकवाड, परिवहन विभाग  नियंत्रण सोलापूर जिल्हा