Sat, Nov 17, 2018 20:48होमपेज › Solapur ›  टेंभुर्णीत अडीच लाखांची चोरी

 टेंभुर्णीत अडीच लाखांची चोरी

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 11 2018 12:10AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णीतील प्रसिद्ध हॉटेल मालकाच्या बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून दीड लाख रोख रकमेसह सोन्याचे दागिने, टीव्ही असा 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत रणजित अनंत बोत्रे (वय 33, रा. टेंभुर्णी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हॉटेल जगदंबा कॉटेजच्या मागील बंगल्यात सर्व जण मंगळवारी रात्री झोपी गेले.

यानंतर पहाटे 5 वा. वडील अनंत बोत्रे यांनी झोपेतून उठवत बंगल्याचे पाठीमागील खिडकीचे गज वाकवून कोणी तरी अज्ञात  चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून लोखंडी कपटावर ठेवलेली चावी घेऊन कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे सांगितले.  कपाटातील रोख रक्कम एक लाख 48 हजार रुपये, गंठण, चार अंगठ्या, दोने पेंडल, पोत हे सोन्याचे दागिने 2 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 12 हजार रुपयाचा टीव्ही असा एकूण 2 लाख 56 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून शहरात भीतीचे वातावरण असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या चोरीच्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी भेट देऊन तपासाबद्दल टेंभुर्णी पोलिसांना सूचना दिल्या.
ठसे तज्ज्ञाच्या पथकाने व श्‍वानपथकाने घटनास्थळास भेट दिली. मात्र पोलिसांना चोरट्यांचा कसलाही सुगावा लागला नाही.