Thu, Jul 18, 2019 00:06होमपेज › Solapur › सोलापूर शहरात घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास

सोलापूर शहरात घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास

Published On: Dec 09 2017 10:05AM | Last Updated: Dec 09 2017 10:05AM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरात यश नगर परिसरात घरफोडी केल्याचे आज (शनिवार दि.९) सकाळी उघडकीस आले. वीज महामंडळात कार्यरत अधिकाऱ्याचे  घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली.

युवराज उत्तम मोरे (वय ३३, डेप्युटी इंजिनिअर बाळे एमएसईबी) यांचे यश नगर येथे घर आहे. ते कुटुंबियांसह मोहोळला गेले होते. मुख्य गेटला कुलूप  लावले नव्हते . चोरट्यांनी थेट दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केल्याचे सकाळी शेजाऱ्यांना समजले. त्यांनी मोरे यांना कळविल्यानंतर घरी चोरी झाल्याचे समजले. 

चोरट्यांनी घरातील दागिने आणि रोख 10 हजारांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.