Sat, Jan 19, 2019 13:47



होमपेज › Solapur › गटारीचे मैलामिश्रीत पाणी चंद्रभागेत

गटारीचे मैलामिश्रीत पाणी चंद्रभागेत

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:16PM



पंढरपूर : प्रतिनिधी

संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा  सोलापूर जिल्ह्यात आली असतानाच मागील महिन्याभरात केलेल्या यात्रा नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे. 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांडपाणी चंद्रभागा नदीत जात असल्याचे कबूल केले. मात्र त्यानंतरही या प्रश्‍नावर प्रशासन फोल ठरले आहे. चंद्रभागा तीरावरील उद्धव घाटावरील ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने या ड्रेनेजमधील मैलामिश्रीत पाणी या उद्धव घाटावरून नदीच्या पात्रात वाहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे.उद्धव घाट हा महत्त्वाचा घाट असून भाविक याच घाटावरून वाळवंटात उतरतात.  याच घाटावरील ड्रेनेज फुटल्याने संपूर्ण उद्धव घाटावर मैलामिश्रीत पाणी वाहते आहे. नाईलाजाने याच दुर्गंधीयुक्‍त पाण्यातून वारकरी भाविकांना चंद्रभागेच्या स्नानासाठी जावे लागते आहे.