Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Solapur › शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे तंत्रनिकेतनचा बळी

शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे तंत्रनिकेतनचा बळी

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 8:50PMसोलापूर : इरफान शेख

सोलापूरसह राज्यातील सहा शासकीय  तंत्रनिकेतने बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.त्याला विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला होता.विद्यार्थ्यांचा डिप्लोमाऐवजी डिग्रीकडे जास्त ओढा असल्याचा अहवाल पुढे करत शासकीय तंत्रनिकेतने बंद करून त्याऐवजी शासकीय डिग्री कॉलेजेस स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पॉलिटेक्निक शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून अस्तित्वातील तंत्रनिकेतने बंद करून त्याचे रुपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा शासन निर्णय झाला आहे.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादाने ग्रस्त असलेले अचलपूर नगरपरिषदेचे  हे पॉलिटेक्निक कॉलेज बंद करावे लागत होते. नगरपरिषदेने ठराव करून  न्यायालयात याचिका दाखल केली होती. केवळ नगरपरिषदेच्या ठरावावर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसलेले डिप्लोमा कॉलेज थेट शासनास हस्तांतरित करून घेण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुधा पहिलीच वेळ असावी. 
स्टाफची लॉटरी अचलपूरचे तंत्रनिकेतन शासनास हस्तांतरित करताना जागा, इमारत, साहित्य यासह कार्यरत स्टाफ वर्ग करून घेण्यात आला आहे. ज्यामध्ये 21 शिक्षक आणि 22 शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 ऑक्टोबर 2017 पासून शासनामध्ये समावेश करण्यात आला आहे.

आता वेतनाची जबाबदारी शासनाने स्वीकारल्याने या भाग्यवान कॉलेजमधील स्टाफची लॉटरी लागली आहे. सोलापूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचे मात्र भाग्य नसल्याने साठ वर्षांपूर्वीचे जीपी कॉलेज दुर्दैवी ठरले आहे. कारण दिलेला शब्द न पाळत प्रशासनाकडून डिप्लोमा कॉलेज डिग्री कॉलेजमध्ये रुपांतरित होत आहे.

निर्णय नगरविकास खात्याचाअचलपूरचे तंत्रनिकेतन कॉलेज  शासनात वर्ग करून घेण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा आहे. मात्र अंमलबजावणी तंत्रशिक्षण खात्याकडून होत आहे. श्रेणीवर्धनाच्या नावाखाली आधीच सहा शासकीय तंत्रनिकेतने बंद करण्यार्‍या तंत्रशिक्षण  विभागामार्फत कोणतीही कुरकुर न करता हा निर्णय स्वीकारला, हे विशेष.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, शिक्षणाची सोय व्हावी हे नगरविकास खात्याला कळते आणि तंत्रशिक्षण खात्याला नाही, हे विशेष.