Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Solapur › स्वीकृतच्या तिन्ही निवडी बिनविरोध

स्वीकृतच्या तिन्ही निवडी बिनविरोध

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:10PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या तिन्ही निवडी शुक्रवारी बीनविरोध झाल्या. आदित्य फत्तेपूकर, मालोजी शेंबडे आणि श्रीनिवास बोरगावकर यांची बीनविरोध निवड जाहीर होताच आ. परिचारक समर्थकांनी पालिकेबाहेर गुलाल आणि भंडार्‍याची उधळण करून जल्लोष साजरा केला आणि नूतन नगरसेवकांची शहरातून मिरवणूकही काढली. 

पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या तीन जागा रिक्त होत्या. पालिकेतील संख्याबळानुसार या तिन्ही जागा सत्ताधारी पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीच्याच निवडूण येणार होत्या. 
त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केवळ तीन उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज ( शुक्रवारी ) या निवडीसाठी सभागृहात पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांनी आदित्य फत्तेपूरकर, मालोजी शेंबडे आणि श्रीनिवास बोरगावकर यांच्या निवडी जाहीर केल्या.

 यावेळी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, प्रशांत शिंदे, अ‍ॅड. गुरूनाथ अभ्यंकर, अक्षय गंगेकर, विवेक परदेशी,  अनुसया शिरसट, मालन देवमारे, लतिका डोके,  अर्चना रानगट, सौ. सुप्रीया डांगे, भाग्यश्री शिंदे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष पांडूरंग घंटी, नागेश भोसले, सचिन डांगे यांच्यासह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवड झाल्यानंतर  तीन्ही नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले. तसेच पालिकेच्या समोर गुलाल, भंडार्‍याची उधळर करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली.