होमपेज › Solapur › अंत्यविधिसाठी गेलेल्याने घरावर चोरट्यांचा डल्ला

अंत्यविधिसाठी गेलेल्याने घरावर चोरट्यांचा डल्ला

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 8:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 मयतीला गेलेल्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून 3 लाख 63 हजारांची रोख रक्‍कम व सोन्या- चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या चोरीची फिर्याद सुदेशकुमार रतनलाल तापडिया ( रा. मंत्री चंडकनगर, भवानी पेठ) यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

सुदेशकुमार तापडिया यांच्या  पत्नीची आई मृत झाल्याने सर्व कुटुंबासह अमरावती येथे 27 ते 30 डिसेंबर याकालावधीत तीन दिवस राहत्या घराला कुलूप लावून  गेले होते.अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला व घरामधील 3 लाख 63 हजार 200 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्‍कम असा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीचा अधिक तपास पोसई सानप करत आहेत.

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

घरातील काम नीट येत नाही व क्षुल्लक कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, नणंद व दिराविरुद्ध विशाखा यल्लप्पा गायकवाड (वय 22, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, चव्हाण वस्ती) या विवाहितेने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाखा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती यल्लप्पा रेवणसिध्द गायकवाड, सासू वनमाला रेवणसिद्ध गायकवाड, तीनही नणंद भाग्यश्री संतोष जाधव, पिंकी जाधव व प्रियंका जाधव व दीर आकाश गायकवाड यांनी 24 फेब्रुवारी 2016 पासून 28 डिसेंबर 2017 पर्यंतच्या काळात काम नीट येत नाही व घरातील क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद सलगर वस्ती ठाण्यात दाखल केली आहे.