Fri, Jul 19, 2019 22:30होमपेज › Solapur › जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर आ. दिलीप सोपल यांच्या मध्यस्तीने तोडगा

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर आ. दिलीप सोपल यांच्या मध्यस्तीने तोडगा

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:30PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी

बार्शी शहरातील सुभाषनगर भागातील गणेश तलाव येथे गोपालकांच्या गाई, म्हशी, रेडा, बैल आदी जनावरांना दोन दिवसांपासून प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आल्यामुळे सुमारे 15 हजार जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. याप्रश्‍नी गोपालकांनी आमदार दिलीप सोपल यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडून तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती.

आ. सोपल यांच्या निवासस्थानी पशुपालकांची अधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, नगर अभियंता समशेर पठाण, सुधीरभाऊ सोपल, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, विरोधी पक्षनेते नागेश अक्‍कलकोटे आदी उपस्थित होते. 

आ. सोपल यांनी गणेश तलाव सुशोभिकरण कामाला कोणताही अडथळा न येऊ देता पूर्वीप्रमाणे जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या. त्याप्रमाणे संरक्षक तार दूर करून एका बाजूने मुरूम, खडी टाकून जनावरांना वाट करून देण्याचे, पशुपालकांनीही प्रशासनाच्या कामात कसलाही अडथळा न आणण्याबाबत सांगण्यात आले. आ. सोपल यांच्या सूचनेनुसार जनावरांचा प्रश्‍न मार्गी लावण्यास मुख्याधिकारी यांनी सहमती दिल्याने पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. 

यावेळी नगरसेवक विलास रेणके, प्रशांत कथले, बापू वाणी, पृथ्वीराज रजपूत, तात्या माळगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू माने, बाळासाहेब तातेड, पशुपालक सुनील मारडकर, मनोज दुगाणे, बापू नांदेडकर, विशाल नांदेडकर, अजय राडेकर, दिलीप सोमाणी, शाम नायकोजी, संभाजी मारडकर, गिरीष नायकोजी, वसंत दहिहंडे, विठ्ठल दहिहंडे, अमोल दुगाणे, विनोद मारडकर, काका गव्हाणे, संदीप बारंगुळे, नितीन शाहिर, भागवत नांदेडकर, वसंत जाधव, दत्तात्रय मारडकर यांच्यासह अनेक पशुपालक उपस्थित होते.