Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Solapur › देगावकरांनी लोकवर्गणीतून बांधली पोलिस इमारत

देगावकरांनी लोकवर्गणीतून बांधली पोलिस इमारत

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 8:47PMसोलापूर : प्रतिनिधी

देगावसह परिसरातील लोकांनी पोलिस इमारत लोकवर्गणीतून साकारली. ‘गाव करील ते राव करील काय’ या उक्‍तीचे तंतोतंत पालन करुन लोकवर्गणीतून साकारलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सलगर वस्ती पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या देगाव पोलिस चौकीचे नवीन जागेत स्थलांतर करुन नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्‍त शशीकांत महावरकर, उपायुक्‍त मधुकर गायकवाड, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त महावीर सकळे, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास काळे, देगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पोलिस आयुक्‍त तांबडे म्हणाले, लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या या पोलिस इमारतीची गावकरी, परिसरातील नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज आहे.  शहराच्या सौंदर्यात भर घालतील अशा पोलिसांच्या सुंदर वास्तू येत्या दोन वर्षांत सोलापुरात उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणारा निधीही प्राप्त झाला आहे.  पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना राहण्यासाठी या इमारती उभारल्या जाणार आहेत. 

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास काळे, नगरसेवक गणेश वानकर, डॉ. सतीश वळसंगकर, डॉ.दादाराव रोटे, जैनोद्दीन शेख, वसंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमास नगरसेविका सुनीता रोटे, राजेंद्र सुपाते, डॉ. प्रसन्न कासेगावकर यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस फौजदार विलास घुगे, पोलिस नाईक नाना शिंदे, हुसेन शेख, प्रवीण कांबळे उपस्थित होते.