Mon, Nov 19, 2018 23:07होमपेज › Solapur › देशात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात 

देशात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात 

Published On: Jan 29 2018 9:42AM | Last Updated: Jan 29 2018 9:42AMबोंडले : विजयकुमार देशमुख

देशात सर्वात जास्‍त दाराने पेट्रोल-डिझेलची विक्री सोलापूर जिल्‍ह्‍यात होत आहे. इतिहासात प्रथमच एवढा दर झाल्याचे बोलले जात आहे. आज तोंडले-बोंडले (ता.माळशिरस) येथील पेट्रोल पंपावरत साध्या पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१.१६ पैसे तर, पॉवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८३.९८ पैसे एवढा झाला आहे. याचबरोबर डिझेलचा दरही वाढलेला असून, डिझेलचा दर प्रतिलिटर ६७.५१ पैसे एवढा तर, पॉवर डिझेल दर प्रतिलिटर  ७०.७३ पैसे एवढा झाला आहे.

या दरवाढीमुळे वाहन चालकांतून नाराजी व्यक्ती केली जात असून, दरवाढ लवकरात  लवकर कमी करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्या येत आहे.