Tue, Feb 19, 2019 23:16



होमपेज › Solapur › सुरेश पाटील यांचे सदस्यत्व रद्द होणार 

सुरेश पाटील यांचे सदस्यत्व रद्द होणार 

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 04 2018 1:22AM



सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन अचे नगरसेवक सुरेश पाटील यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी जून १०१८ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र आयुक्त कार्यालयात दिले आहे. त्यामुळे महापालिका अधिनियम कलम ११ नुसार त्यांचे सभासदत्व अनर्ह ठरते. त्यामुळे त्यांचा अर्ज सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, सुरेश पाटील उपस्थिय न राहिल्यास त्‍यांचे सभासदत्व रद्द होणार आहे.