Thu, Jun 20, 2019 06:34होमपेज › Solapur › ९५ हजार शेतकर्‍यांची माहिती चुकीची

९५ हजार शेतकर्‍यांची माहिती चुकीची

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:31PM सोलापूर : प्रतिनिधी 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जाहीर केलेल्या शेतकरी कृषी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांपैकी 94 हजार 464 शेतकर्‍यांची माहिती चुकीची आढळून आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकर्‍यांनी येत्या 5  फेब्रुवारीपर्यंत संबंधित बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 47 हजार 11 शेतकर्‍यांची माहिती चुकीची आढळून आली आहे तर राष्ट्रीयीकृत बँकांकाडील 38 हजार 657 शेतकर्‍यांची माहिती चुकीची आढळून आली आहे, तर ग्रामीण बँकांकडील 8 हजार 796 शेतकर्‍यांची माहिती चुकीची आढळून आली आहे. अशा शेतकर्‍यांनी आपले आधार क्रमांक, नाव, बँक अकाऊट, मोबाईल नंबर बरोबर आहे की चुकीचा आहे याची पडताळणी संबंधित बँकेत जाऊन करावी, असे आवाहन देशमुख यांनी केली आहे. दुसरीकडे आजपर्यंत अर्ज केलेल्या 51 हजार 575 शेतकर्‍यांनी दिलेली माहिती बरोबर असून त्या शेतकर्‍यांच्या नावे पैसे जमा करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, शासनाने अपात्र लाभार्थ्यांना 5 फेब्रुवारीपर्यंतची जी मुदत दिली आहे ती अल्प असून त्यात वाढ करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.