Sat, Apr 20, 2019 10:10होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीच्या विवाहावरून तरुणास बेदम मारहाण

अल्पवयीन मुलीच्या विवाहावरून तरुणास बेदम मारहाण

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 10:13PMगेवराई : आठवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा लग्नसोहळा 12 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, तुम्ही या अल्पवयीन मुलीचा विवाह का करता म्हणून गावातीलच संदीप निवृत्ती चौधरी या 32 वर्षीय तरुणाने जाब विचारला असता मुलीच्या नातेवाईकांनी लोखंडी पाईप, काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथे गुरुवारी रात्री 8 वा. सुमारास घडली. 

दरम्यान, मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून तो रात्रभर बेशुद्धावस्थेत घरातच पडून होता. शुक्रवारी सकाळी गावातीलच काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर  तरुणास येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..