Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Solapur › लाभार्थ्यांच्या 31 लाखांवर पाणी

लाभार्थ्यांच्या 31 लाखांवर पाणी

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:34PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या विविध योजनांतून लाभार्थ्यांनी स्वखर्चानी 31 लाख 57 हजार 277 रुपयांची वस्तू खरेदी गतवर्षी केली. मात्र या लाभार्थ्यांना वेळेत अनुदान देण्यात आले नाही. मार्च संपल्याने या लाभार्थ्यांना अनुदान न देण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या दरमहा परीक्षेत सतत तीन वेळा बेस्ट बीडीओ ठरलेल्या प्रशांत मरोड यांच्या कार्यालयात हा प्रकार झाल्याने आश्‍चर्य निर्माण होत आहे. प्रशासकीय अनास्थेचा मोठा आर्थिक  फटका लाभार्थ्यांना बसला आहे. 

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून दक्षिण सोलापूर पंचायत समितीमधील लाभार्थ्यांना विविध वस्तूंसाठी 19 लाख 68 हजार 156 रुपयांचे अनुदान खरेदीसाठी मंजुरी देण्यात आल्याने इतक्या रकमेची खरेदी लाभार्थ्यांनी केली आहे. मात्र मार्च एन्ड बंद झाल्याने या लाभार्थ्यांना आता अनुदान मिळणे अवघड झाले आहे. स्वत:च्या खिशातून पैसा खर्च करुन, उधारवारी करुनही लाभार्थ्यांना देय अनुदान देण्यात येत नसल्याने प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. 

समाजकल्याण विभागामार्फत दक्षिण पंचायत समितीमधील 14 लाभार्थ्यांना पाच एचपी पाणबुडी मोटार खरेदीसाठी 2 लाख 94 हजार रुपयांचे अनुदान थकले गेले आहे. प्रति लाभार्थ्यांना यासाठी 21 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. अंपग झेरॉक्स मशीनसाठी 12 लाभार्थ्यांचे 4 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान रोखण्यात आले आहे. प्रति लाभार्थी 40 हजार रुपयांचे अनुदान यासाठी देण्यात येते. अपंगाच्या पिठाच्या गिरणीसाठी 23 लाभार्थ्यांसाठी व अन्य मागासर्गीय 20 लाभार्थ्यांचे 6 लाख 52 हजार 396 रुपयांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. 

या लाभार्थ्यांना खरेदीसाठी प्रति लाभार्थी 15 हजार 172 रुपयांचे अनुदान देण्यात येते. शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 68 लाभार्थी निवडण्यात आले होते. त्यांचे 3 लाख 24 हजार 360 रुपयांचे अनुदान थांबले आहे. यासाठी प्रति लाभार्थी 4 हजार 770 रुपये अनुदान देण्यात येते. मुलींचे सायकल खरेदीसाठी 31 मुलींची निवड करण्यात आली होती. यासाठी 1 लाख 27 हजार अनुदान मिळाले गेले नाही. यासाठी प्रति लाभार्थी 4 हजार 100 रुपये अनुदान देण्यात येते. मुलांच्या सायकलीसाठी 21 लाभार्थी निवडण्यात आले होते. त्यांचे प्रति लाभार्थी 4 हजार तीनशे रुपयाप्रमाणे 90 हजार 300 रुपयांचे अनुदान थांबले गेले आहे. 

महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 90 टक्के अनुदानावर विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या विभागाकडून लाभार्थ्यांसाठी देय असलेली 11 लाख 89 हजार 71 हजार रुपयांचा अनुदान मिळण्यापासून लाभार्थी वंचित राहिले आहे. 

पिकोफॉल मशीनसाठी 3 लाभार्थ्यांचे प्रति लाभार्थी 7  हजार 290 प्रमाणे 21 हजार 870 रुपये अनुदान मिळणे थांबले आहे. अपंगांच्या गिरणीसाठी दोन लाभार्थ्यांचे प्रति लाभार्थी 15 हजार 172 रुपयांप्रमाणे 30 हजार 344 रुपये अनुदान थांबले आहे. शिलाई मशीनसाठी एका लाभार्थ्याचे 4 हजार 770 रुपये अनुदान मिळाले नाही. तीनचाकी सायकलसाठी एका अपंगाचे 7 हजार 989 रुपये अनुदान मिळाले नाही. 

पिकोफॉलसाठी 38 लाभार्थी निवडण्यात आले होते. प्रति लाभार्थी 7 हजार 290 याप्रमाणे 2 लाख 77 हजार 20 रुपयांचे अनुदान मिळाले नाही. पिठाची गिरणीसाठी 19 लाभार्थ्यांचे 2 लाख 88 हजार 268 रुपये अनुदान मिळाले नाही. मुलींचे सायकलीसाठी 63 लाभार्थ्यांचे 2 लाख 58 हजार 300, तर शिलाई मशीनच्या 63 लाभार्थ्यांचे 3 लाख 510 रुपये अनुदान मिळाले नाही.