Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › शेतकरी कर्जमाफीचे २४८ कोटी मिळाले!

शेतकरी कर्जमाफीचे २४८ कोटी मिळाले!

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा व ज्या शेतकर्‍यांनी नूतनीकरण केले नाही त्यांनी 30 जून पर्यंत नूतनीकरण करण्याचे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी केले आहे. बँक ऑफ इंडियाच्या सात जिल्ह्यांमधील शाखांमधील 34 हजार 415 खात्यांमध्ये 248 कोटी रक्कम जमा झाली आहे. टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 22 हजार 875 शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीतून 159 कोटी 4 लाख 1 हजार 617 रुपये जमा झाले असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 11,688 शेतकर्‍यांचा समावेश आहे. सोलापूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सात जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यांत एकूण 84 शाखा असून एकट्या सोलापूर जिल्ह्यात 57  शाखा आहेत. ही कर्जमाफी 1.50 लाखांपर्यंत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना झाली आहे. ज्यांचे कर्ज 1.50 लाखांच्या पुढे आहे त्यांनी दीड लाखांच्या पुढील रक्कम भरुन दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करुन घ्यावे. कर्जमाफीच्या नूतनीकरणाने शेतकर्‍यांना पुढील वर्षी  पीक कर्जासाठी पात्र होता येईल, अशी माहिती बँक अधिकार्‍यांनी दिली.

कर्जमाफीची  बँक  ऑफ   इंडियाच्या खातेदारांना मिळालेल्या रकमेत सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार  शेतकर्‍यांची  संख्या  मोठी आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 11 हजार 688 शेतकर्‍यांना 78 कोटी 83 लाख 67 हजार 380 रुपयांचा फायदा झाला. बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्ह्यात 57 शाखा आहेत.लातूर- 7 शाखा, नांदेड- 6 शाखा,  उस्मानाबाद- 5 शाखा, हिंगोली- 4 शाखा, बीड-4 शाखा, परभणी- 2 शाखा. या शाखांमधील शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जमा झाली आहे. 

तर पीक कर्जासाठी पात्र

सोलापुरातील ज्या शेतकर्‍यांवर दीड लाखांवर पीक कर्ज आहे त्यांनी  30 जूनपर्यंत याचे नूतनीकरण करावे. दीड लाखांवर जेवढी रक्कम आहे ती भरुन दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, अशी माहिती बँक अधिकार्‍यांनी दिली. लाभधारक व खातेधारक शेतकर्‍यांनी नूतनीकरण केल्यास पुढील वर्षी कर्जप्राप्तीसाठी पात्र होता येईल.