Wed, Apr 24, 2019 22:08होमपेज › Solapur › स्थायी सभापतिपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात 

स्थायी सभापतिपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात 

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसंदर्भातील वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाला भाजपच्या उमेदवार राजश्री कणके यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल करतेवेळी बराच गोंधळ झाला होता. उमेदवारी अर्ज भरताना भाजप उमेदवारांच्या अर्जांची पळवापळवी करण्यात आली होती. याबाबत भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाद मागितली. याबाबतचा अहवाल व पुराव्याच्या आधारे विभागीय आयुक्तांनी आधी तुमच्या पातळीवर योग्य निर्णय घ्या, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले. 

यानंतर काही वेळेतच त्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने राबविण्याचे आदेश काढले. या आदेशाविरोधात शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने फेरनिवडणूक रद्दबादल करून पहिलीच प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात राजश्री कणके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.