Wed, Jan 16, 2019 05:44होमपेज › Solapur › सोलापूर उपायुक्तांनी पत्रकारांविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची पंढरपूर पत्रकारांची मागणी

सोलापूर उपायुक्तांनी पत्रकारांविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची पंढरपूर पत्रकारांची मागणी

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:45PMपंढरपूर : प्रतिनिधी

बातमी छापल्याचा राग मनात धरून दै. पुढारीचे कार्यकारी संपादक आणि सोलापूर शहरातील बातमीदाराच्याविरोधात सोलापूर उपायुक्तांनी दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात आज ( दि. 8 जुन ) रोजी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले आहे. 

यासंदर्भात श्रमिक पत्रकार संघ, पंढरपूर पत्रकार संघ, पंढरपूर श्रमिक पत्रकार संघांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर येथील पोलीस उपायुक्तांनी बातमी छापल्याचा राग मनात धरून दै. पुढारीचे कार्यकारी संपादक व बातमीदाराविरोधात दाखल केलेला गुन्हा पत्रकारितेची गळचेपी आहे. यासंदर्भात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा.

यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल उंबरे, पंढरपूर श्रमिक पत्रकार  संघाचे अध्यक्ष विनायक हरिदास, पंढरपूर पत्रकार संघाचे विकास पवार, जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, नवनाथ पोरे, मोहन डावरे, सुधाकर कवडे,  सचिन कांबळे, बाहुबली जैन, अपराजित सर्वगोड, माउली डांगे, स्वप्नील कुलकर्णी, सचिन कसबे, गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.