Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › Solapur › पवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:10PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी

देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट प्रसारित करणार्‍या ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजद्वारे बदनामी करणार्‍या पेज अ‍ॅडमिनसह सुत्रधारांवर सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या पोस्टवर ‘मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’ अशा आशयाचा मजकूर पोस्ट करुन दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जावेत, अशा आशयाचे निवेदन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सह. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवार यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबाबत अनुद‍्गार काढण्यात आल्याने जनतेमधून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी या पेजच्या अ‍ॅडमिनसह या पेजवर पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍यांवर तातडीने सायबर क्राईमअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. या निवेदनाची प्रती आम्ही सह.पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिली असल्याची माहिती शरदक्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे.
 

हे निवेदन देताना प्रतिष्ठानचे केंद्र प्रमुख श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष राजन जगताप, सोमा ढवण, विकास घोलप, नवनाथ चव्हाण, संतोष कवडे, प्रवीण कोळेकर, अवि पवार, उपाध्यक्ष विक्रम लाटे, खजिनदार प्रशांत शिंदे, हनुमंत पाटोळे, बापू खरात आदी उपस्थित होेते.