Mon, Jul 22, 2019 00:48होमपेज › Solapur › पार्क स्टेडियम गाळेभाडेवाढीबाबत कमिटी नेमण्याचा निर्णय 

पार्क स्टेडियम गाळेभाडेवाढीबाबत कमिटी नेमण्याचा निर्णय 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:37PMसोलापूर :  प्रतिनिधी

पार्क स्टेडियमच्या गाळेभाडेवाढीसंदर्भात कमिटी नेमण्याचे अधिकार महापौरांना देण्याचा निर्णय सोमवारी स्डेडियम कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.स्टेडियम कमिटीची बैठक महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, हाजीमलंग नदाफ आदी उपस्थित होते. मनपाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे परगावी असल्याने ते अनुपस्थित होते. पार्क स्टेडियमच्या 59 गाळ्यांची मुदत संपल्याने ते खाली करण्याच्या नोटिसा प्रशासनातर्फे गाळेधारकांना देण्यात आल्या होत्या. याशिवाय गाळेधारक न्यायालयात जाऊ नये म्हणून प्रशासनाने कॅव्हेटही दाखल केले होते. त्यामुळे गाळेभाडेवाढीबाबतचा विषय सोमवारी कमिटीच्या बैठकीत चर्चिला गेला. गाळे भाडेवाढ लिलाव पद्धतीने करण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. गाळेभाडेवाढ करण्याचे दोन-तीन प्रकार आहेत. मात्र, यासंदर्भात संदिग्धता आहे. जळगावसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्‍नी विधिमंडळात चर्चा झाली.

यावर मुख्यमंत्र्यांनी नवीन धोरण ठरविण्याचे जाहीर केले होते. तेव्हा सोलापूरबाबतही नेमके काय करावयाचे याचा निर्णय शासनाच्या अंतिम निर्णयानंतरच घ्यावा लागणार आहे, असे ना. देशमुख यांनी यावेळी सांगितले.चालू बाजारभावानुसार भाडे देण्यास गाळेधारक  तयार आहेत. जे चालू बाजारभाव देणार नाहीत अशांचे गाळे लिलाव करावेत आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. शेवटी महापौरांच्या अध्यक्षतेखाली याप्रश्‍नी कमिटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना महापौरांनी आयुक्तांचा कमिटीत समावेश करणार आहेत. कमिटीमध्ये अन्य लोकांनाही घेण्यात येऊन याप्रश्‍नी योग्य तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. विविध 18 विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. अनेक विषयांना मंजुरीही देण्यात आली. 

Tags : Solapur, decision,  appoint,  committee, development, Park Stadium