Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Solapur › चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या शंभर कलाकारांची फसवणूक

चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या शंभर कलाकारांची फसवणूक

Published On: May 24 2018 11:55PM | Last Updated: May 24 2018 11:55PMसोलापूर : प्रतिनिधी

चंदेरी दुनियेत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एक, दोन न्हवे तर तब्बल शंभर नवोदित कलाकारांची फसवणूक झाल्याची घटना आज सोलापुरात निदर्शनास आली. ज्यामधे मुंबई, राजस्थान आणि बेंगलोरमधील मुला-मुलींचा समावेश होता.

घडलेली घटना अशी की, गोल्ड माईन या प्रोडक्शन कंपनीच्या नावे एका तोतया निर्मात्याने ऑनलाईन माध्यमाद्वारे नवोदित कलाकारांना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवले. त्यांना शूटिंगच्या नावे बेंगलोर, हैद्राबाद फिरवून आणले. यावेळी यातील मुला-मुलींकड़ून पैसे उकळले. आणि अचानक एका लक्झरी बसने या सर्वांना सोलापुरात जूना पूना नाका येथे आणून सोडले. त्यांना अंबेसिडर हॉटेल लगतच्या भाग्यलक्ष्मी लॉज जवळील शेडमध्ये थांबावे लागले. पैसे संपल्याने त्यांची खाण्या-पिण्याची वानवा झाली. परतीच्या प्रवासासाठीही त्यांच्याजवळ पैसे नव्‍हते. 

Tags :chanderi world, bollywood, film, cinema, solapur, NCP

ही घटना समजताच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, संजय पवार यांनी त्यांची सकाळपासून चहा-पानाची व जेवनाची व्यवस्था केली. रात्री ९ वाजता मुंबईच्या रेल्‍वेचे तिकीट काढून, रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून स्वतंत्र बोगी बुक केली आणि सर्वांना निरोप दिला. आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. तर गणेश डोंगरे, विनोद भोसले, बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला, माउली पवार, गणेश देशमुख आदिंनी परिश्रम घेतले.

'भारत माता की जय'च्या घोषणा 

घरात आई-वडिलांना न सांगता मुंबई, राजस्थान आणि बेंगलोरमधील मुले-मुली अचानक एका अनोळखी ठिकाणी उतरली गेली. खायला आणि परत जायला खिशात पैसा नाही. अशा वेळेस राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार आणि त्यांचे मित्र मदतीला धावून आले. त्यांना मुंबईच्या रेल्‍वेत बसवले. रेल्‍वे सुरु झाली आणि त्या सर्वांच्या तोंडून 'गणपती बप्पा मोरया, भारत माता की जय'च्या घोषणा निघाल्या. भरल्या डोळ्यांनी त्यांनी सोलापूरची माणुसकी बघून निरोप दिला.