Mon, Jun 17, 2019 14:28होमपेज › Solapur › ‘आरटीई’अंतर्गत अर्ज करण्यास १ ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

‘आरटीई’अंतर्गत अर्ज करण्यास १ ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:13PMसोलापूर ः  प्रतिनिधी

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत (आरटीई)   25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना 1 ते 20 फेब्रुवारी याकालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रवेश  वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखपर्यंत असणार्‍या खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती,  इतर मागासवर्ग (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, पारसी, जैन व शीख) तसेच या वर्षापासून घटस्फोटित महिला, न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, विधवा महिलांची बालके, अनाथ बालकांसाठी आहेत.

या प्रवेशासाठी सर्व माध्यमाच्या विशेष मागासवर्ग व धार्मिक अल्पसंख्याक सर्व बोर्डाच्या (राज्य मंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. व आय.बी.सह) विनाअनुदानित (अल्पसंख्याक) वगळून कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक) वगळून तसेच मदरसा, मक्तब व धार्मिक पाठशाळा वगळून सर्व कायम विनाअनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत. शाळांना नोंदणी करण्यासाठी 17 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून 27 जानेवारीपर्यंत मुदत आहे. ही नोंदणी पूर्ण झाल्यावर शाळांची पडताळणी करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी दोन वेबसाईट

25 टक्के प्रवेशासाठी https://rte25admission.maharashtra.gov.in किंवा  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
 या वेबसाईटचा वापर करावा लागणार आहे. 

शहरात एकूण पात्र 20 शाळा 

आरटीईअंतर्गत मनपा शिक्षण मंडळअंतर्गत पात्र असणार्‍या शाळांमध्ये राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल (केकडेनगर), नागेश करजगी आर्किड स्कूल, सोलापूर, राज मेमोरियल इंग्लिश स्कूल (जुनी मिल कंपाऊंड), गांधीनाथा रंगजी इंग्लिश मीडियम स्कूल, सहस्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल, व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल, पोलिस पब्लिक स्कूल, सुरवसे इंग्लिश मीडियम स्कूल, सुशीलकुमार शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, इंडियन मॉडेल स्कूल, मॉडेल पब्लिक स्कूल, इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसएई, युनिक  इंग्लिश मीडियम स्कूल, बटरफ्लाय  इंग्लिश मीडियम स्कूल, पद्मश्री रामसिंग भानावत  इंग्लिश मीडियम स्कूल, गुडशेफर्ड  प्रायमरी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे.