Sun, Feb 17, 2019 01:00होमपेज › Solapur › न्यायालय आवारात पोलिसास धक्‍काबुक्‍की

न्यायालय आवारात पोलिसास धक्‍काबुक्‍की

Published On: Jan 06 2018 1:29AM | Last Updated: Jan 05 2018 8:53PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

अक्‍कलकोट येथील खुनामध्ये आरोपी असलेल्यांना न्यायालयात तारीख असल्याने न्यायालयात हजर केले होते. न्यायालय आवारात आरोपी राजू महादेव चव्हाण याने त्याचा भाऊ राहुल चव्हाण यास मारहाण करून डोके फोडले. यावेळी पोलिस मधे पडल्यानंतर पोलिस शिपाई श्रीकांत राजेश साळुंखे यांना धक्‍काबुक्‍की करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत राजेश साळुंखे व इतर पोलिस कर्मचारी यांनी जिल्हा कारागृहातून भीमराव देवराव राठोड, राहुल भीमराव राठोड, राजू महादेव चव्हाण, रोशन भीमराव राठोड व इतर तीन आरोपी असे सात जणांस कारागृहातून बाहेर काढून त्यांना सरकारी वाहनातून न्यायालयात हजर करण्यासाठी हजर केले होते. राजू चव्हाण यास भेटण्यासाठी त्याचा भाऊ राहुल चव्हाण आला होता. तेव्हा दोघा भावांमध्ये वकील देण्याच्या कारणावरून राजू चव्हाण याने त्याचा  राहुल चव्हाण यास मारण्यास सुरुवात केली.  तेव्हा त्यास सोडवण्यास मधे गेले असता श्रीकांत साळुंखे यांना धक्‍काबुक्‍की केली. याबाबत त्यांनी फिर्याद दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर करीत आहेत.