होमपेज › Solapur › मोहोळ-आळंदी रस्त्याची मोजणी रोखली

मोहोळ-आळंदी रस्त्याची मोजणी रोखली

Published On: Apr 10 2018 9:00AM | Last Updated: Apr 10 2018 9:00AMपंढरपूर : प्रतिनिधी

मोहोळ आळंदी रस्त्याची मोजणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख माऊली भाऊ हळणवर व शेतकरी बांधव यांनी रोखली आहे. अगोदर मोबदला द्या मगच मोजणी करायला या.  शेतकर्‍याना मोबदला दिल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा देताच अधिकार्‍यांनी देगाव (ता.पंढरपूर) येथून पळ काढला आहे.

शेतकर्‍यांना कोणताही मोबदला न देता शासनाने शेतकर्‍यांची जबरदस्तीने शेतजमिनी ताब्यात घेवून चौपदरी रस्ते तयार करण्यासाठी मोजणी सुरु केली आहे. मात्र अगोदर मोबदला द्या मगच मोजणी करण्यासाठी या.  मोबदला दिल्याशिवाय एक इंचही जमिन देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांनी देताच अधिकारी, कर्मचारी यांनी मोजणी न करताच तेथून पळ काढला. यावेळी धनाजी घाडगे, मा. सरपंच संतोष घाडगे, लक्ष्मण नावडे व इतर बाधित शेतकरी उपस्थित होते.

Tags : solapur, solapur news, mohol, mohol alandi road,