Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Solapur › उसाच्या टॅ्रक्टर ट्रॉलीला बसची धडक; 23 प्रवासी जखमी

उसाच्या टॅ्रक्टर ट्रॉलीला बसची धडक; 23 प्रवासी जखमी

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी पुलावर उसाच्या टॅ्रक्टर ट्रॉलीला मागून ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिल्याने बसमधील 23 प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास झाला.

सीताराम (वय 35, रा. हुबळी, कर्नाटक), कुमारस्वामी यलय्या जंगम (37), सुमत चावा (29), राजेश्‍वरी तुनही (24), श्‍वेता गलय्या पोकली (26),  मुजबी रहिमान (38), महेश टी (32), विनोहर श्रीनिवास अदे (30), अनुशा कोलपूर (22), अनिल रावी (27), राजू किशन (27), अशोक पी. (31), अभिषेक चंदेल (27) श्रीनिवास नागुंनवटे (30,  सर्व रा. हैदराबाद), स्वप्निल जिलाही (29, रा. पुणे), मोहम्मद ईस्माईल (वय 57, रा. काहिनूर, तेलंगणा), देवेंद्र पांडे (वय 24, रा. पुणे),  शादमाने शकिल अहमद (वय 22, रा. बिजनूर, उत्तर प्रदेश), देवब्रत ब्रिजेश शुक्‍ला (वय 24, रा. महाराजगंज, उत्तर प्रदेश), वैदुला मल्लिकार्जुन राव (48, रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश), तेजस आशुतोष देशपांडे (27, रा. कोथरूड, पुणे), अब्दुला हाफिज कादिर (42, रा. बिदर, कर्नाटक), अजय कि. परांजपे (26, रा. हडपसर, पुणे)अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरील सर्व जखमी हे मंगळवारी रात्री मॉर्निंग स्टार ट्रॅव्हल्स बसमध्ये बसून पुणे ते हैदराबाद जात होते. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास बस लांबोटी पुलावर आली असता समोर जाणार्‍या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडकली. यामध्ये वरील प्रवासी जखमी झाल्याने त्यांना टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात 
आली आहे.