Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Solapur › महालक्ष्मी यात्रेनिमित्त गवळी समाजाने पळविल्या म्हशी

महालक्ष्मी यात्रेनिमित्त गवळी समाजाने पळविल्या म्हशी

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी

आषाढीनिमित्त सोलापूर येथील वीरशैव लिंगायत गवळी  समाजाचे कुलदैवत श्री महालक्ष्मी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजारी करण्यात आली. यावेळी समाजाच्यावतीने म्हशी पळविण्याचा कार्यक्रम पार पडला.

वीरशैव लिंगायत गवळी समाज महिला मंडळाच्यावतीने मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच सायंकाळी 5 वाजता सिव्हील कंपौंडमध्ये महिला मंडळाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सायंकाळी 7 वाजता गवळी समाजातील शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा समाजाच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत समाजातील शाहिरांच्या गाण्याच्या स्पर्धा मंडपामध्ये पार पडल्या. तसेच तुळजापूर, विजापूर व पंढरपूर येथून मोटार सायकलीवर जल सोलापूर शहर युवक संघटनेच्यावतीने आणून अभिषेक करण्यात आला. पंचामृत भक्‍तीभावाने महाअभिषेक करून पहाटे 5 वाजता गवळी समाजाचे कुलदैवत श्री महालक्ष्मीची महाआरती करण्यात आली. दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत पोटफाडी ते सिद्धार्थ चौक या मार्गावर म्हशी पळविण्यात आल्या. 

यावेळी उत्सव प्रमुख राजू परळकर, भारत परळकर, सुरेश बहिरवाडे, लक्ष्मण पंगुडवाले, प्रभाकर परळकर, शिवाजी परळकर, नारायण दहिहंडे, लिंबाजी कलागते, कुमार साठे, बाळू भास्कर, लता झिपरे, विजय परळकर, बाबू औरंगे, विजय झिपरे, बापू परळकर, प्रभाकर हुच्चे आदी तसेच सर्व लिंगायत गवळी समाजातील भाविक  बहुसंख्येने उपस्थित होते.