Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Solapur › पंढरपूर नगरपालिकेचे साडेतीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

पंढरपूर नगरपालिकेचे साडेतीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 10:16PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने मागील वर्षाचे (सन 2017-18)  साडेतीन लाख (3,59,205) रुपयांचे शिल्लक अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले तर सन 12018-19 करिता नागरी सेवा सुविधा  पुरविण्यासाठी भरीव वार्षिक अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातून पाणी पुरवठा, स्वच्छता, उद्यानाचा विकास, रस्ते बांधणी, नवीन गटार योजना राबविणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.

मंगळवारी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत वार्षिक सभा घेऊन अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. या अंदाजपत्रकात मागील वर्षीच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत भरीव आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. चौदावा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान जिल्हा व राज्यस्तर, रमाई आवास योजना, श्रमसाफल्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा, यमाई तलाव शुशोभिकरण, सुजल निर्माण अभियान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना  , रस्ते दुरुस्ती, नवीन पाईपलाईन खरेदी, रस्ते बांधणी, नवीन गटारे, नामसंकीर्तन सभागृह, नाट्यगृह बांधणी, स्मशानभूमी सुधारणा करणे आदी विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार अनाधिकृत बांधकामे कंपाौंडेबल स्ट्रक्‍चर पॉलिसी इंप्लीमेंट करून नियमित करण्यात यावीत. याकरिता 50 लाख रुपयांची तरतूद तर जुने पाण्याचे जलकुंभ दुरुस्तीसाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी अग्निशमनवर 2524313 रुपये तरतूद करण्यात आली होती. तर या वार्षिक अंदाजपत्रकात 2850654 रुपयांची तरतूद करीत 3 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर रोडलाईटसाठी 2 लाख 25 हजारांची वाढीव तरतूद, पाणीपुरवठा विभाग 6 लाख रुपये, पाणी पुरवठा केंद्र 2 लाख, रुग्णालय 1 लाख, बांधकामे 41 लाख, सार्वजनिक उद्याने 3 लाख, आरोग्य 4 लाख, शहर सफाई वेतन 2 लाख, नागरी हिवताप 6 लाख रुपयांची वाढीत अंदाजपत्रकीय तरतुद करण्यात आली आहे. आश्‍चर्य कारक म्हणजे मेन ऑफिसचे झेरॉक्स बिल भागील वर्षी 135000 रुपये होते. यात वाढ करून चालू आर्थिक वर्षात 200000 (दोन  लाख)रुपये  तरतूद करण्यात आली आहे तर प्रदुषण निमंत्रण मंडळ उपकर म्हणून 60 हजार रुपयावरून अडीच लाख इतकी वाढीव तरतूद करण्यात आली  आहे.