Wed, Mar 27, 2019 02:02होमपेज › Solapur › निवडणुकीच्या कारणावरुन उमेदवाराच्या खुनाचा प्रयत्न

निवडणुकीच्या कारणावरुन उमेदवाराच्या खुनाचा प्रयत्न

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:19PMसोलापूर : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या    प्रभाग क्र. 14 च्या  पोटनिवडणुकीच्या  कारणावरुन अपक्ष उमेदवारावर तलवारीने  हल्ला  करुन  त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊजणांंविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसिम   उर्फ मुखरी अ. रहिम सालार (वय 28, रा. सिध्देश्‍वर पेठ, चमनशा टेकडी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन असिफ तिम्मापुरे, बाबा जिशान दंडोती, मोहसिन गुलाब मैंदर्गीकर, अमिन कामले, मन्सूर पठाण, सद्दाम दौला हत्तुरे, ताजमत हत्तुरे, सलिम तिम्मापुरे, कलिम तिम्मापुरे (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसिम सालार हा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 14 क मधील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा होता. शनिवारी मध्यरात्रीच्यासुमारास पेंटर चौकातील बोळात रूबी हॉटेल येथे वसिम सालार व त्याचा मेहुणा चहा पिऊन मोटारसायकल काढून जात होते. त्यावेळी असिफ तिम्मापुरे व त्याचे साथीदार हे अ‍ॅक्सेस, बुलेट, युनिकॉर्न, अ‍ॅव्हिएटर अशा दुचाकींवरुन आले व त्यांनी वसिम सालार याचा पाठलाग करुन निवडणुकीच्या कारणावरुन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिम्मापुरे व त्याच्या साथीदारांनी दुकानदारांना दुकाने बंद करा, असे म्हणून दुकाने बंद करण्यास लावून दहशत निर्माण केली व हातातील तलवार व दांडक्याने सालार यास मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. राठोड तपास करीत आहेत.

Tags : Solapur, attempt,  kill, candidate, election