Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Solapur › पंतप्रधानांनी साधला मोहोळच्या बचत गटातील महिलांशी संवाद

पंतप्रधानांनी साधला मोहोळच्या बचत गटातील महिलांशी संवाद

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 9:01PMमोहोळ : वार्ताहर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जुलै रोजी देशभरातील विविध राज्यांच्या महिला बचत गटातील महिलांशी वेब कास्टिंगद्वारे थेट सुसंवाद साधला. महिला बचत गटांनी केलेले उल्लेखनीय कार्य, व्यवसाय व उत्पादने यांचा आढावा घेतला. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेब कास्टिंगद्वारे महिला बचत गट सदस्यांशी सुसंवाद साधला. याचे प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे करण्यात आले होते. यात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि स्वयं शिक्षण प्रयोग पुणेच्या सदस्यांनी मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातून संवाद साधत आपापल्या बचत गटाच्या कार्याची माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी कृषी पूरक उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे हे होते. यावेळी किरण माने, राजरत्न जावळे आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेदरम्यान कृषी विज्ञान केंद्र, मोहोळचे प्रमुख डॉ. नांद्रे, दिनेश क्षीरसागर, डॉ. तानाजी वळकुंडे, काजल जाधव यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दिघे  यांनी केले.या कार्यक्रमात काका अडसुळे, रेश्मा राऊत, योगेश बोडके, महेश ढवळे, सुयोग ठाकरे, तुषार आहिरे, नरेंद्र जाधव, संजय बनसोडे, ज्ञानेश्‍वर तांदळे, अरुण गांगोडे आदींसह  महिला आर्थिक विकास महामंडळ आणि स्वयं शिक्षण प्रयोग, पुणे यांचे अंतर्गत असलेल्या बचत गटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.