Sat, Jan 19, 2019 02:26होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांनी पंढरीत महापूजेसाठी येऊ नये

मुख्यमंत्र्यांनी पंढरीत महापूजेसाठी येऊ नये

Published On: Jul 17 2018 1:40AM | Last Updated: Jul 17 2018 1:38AMपंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्‍न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना कोणत्याही प्रकारे महापूजेपासून राखले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत देण्यात आला़येथील श्रीराम मंगल कार्यालयात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली़  यावेळी कोपर्डी घडनेतील अत्याचारित मुलीचे वडील बबन सुद्रीक, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, मिलिंद भोसले आदी उपस्थित होते़

प्रास्ताविक राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केले़. मराठ्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाल्याशिवाय शासकीय व निमशासकीय नोकरभरती करण्यात येऊ नये़ मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये  टक्के सवलत मिळावी़ कोपर्डी घटनेतील आरोपींना झालेली फाशीच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी़ आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीची अमंलबाजावणी करण्यात यावी़ शेतीमाल उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावाची अंमलबजावणी करावी़ समतावादी संत परंपरेवर टिका करणार्‍या मनोहर भिडे यांच्यावर समाजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, असे ठराव मांडले़  आवाजी मताने या ठरावाला मंजुरी देण्यात आली़

यावेळी सर्वच मान्यवरांनी राज्य सरकारवर सडकून टिका करीत शासन मराठा समाजाचा अंत पाहत असून भविष्यात राज्यभरात समाजातर्फे उग्र आंदोलन झाल्यास त्यास राज्य शासन जबाबदार राहिल असा इशारा दिला. बहुतांश शेतकरी असलेला मराठा समाज अधोगतीला जाण्यास शासन  व शासनाची धोरणे जबाबदार असल्याचा  आरोप करीत मराठा समाजाने आजवर शांतता व संयमाने आपल्या मागण्या मांडल्या मात्र सरकार त्याकडे बेफीकरीपणे पाहत असल्यामुळे यापुढे शांततेचा विचार सोडून आक्रमक भुमिका घेतली जाईल.मराठा समाजाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी क्रांतीचे पाऊल उचचले असून कोणत्याही क्षणी उग्र आंदोलन केले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांना महापूजेपासून रोखण्यासाठी गनिमीकावा अवलंबणाऱ़़ असल्याचे यावेळी स्पष्ट करून आषाढी यात्रेपूर्वी मागण्या मान्य न करता मुख्यमंत्री पंढरपुरात आले तर छत्रपती शिवरायांनी सांगितलेल्या गनिमीकावा तंत्राचा अवलंब करून आंदोलन केले जाईल़ त्यासाठी राज्य भरातील तरुण आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतील़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्या अन्यथा महापूजेसाठी येऊ नये, असा इशारा बैठकीत देण्यात आला़