Thu, Aug 22, 2019 10:56होमपेज › Solapur › तीर्थकर पुन मॅरेथॉनच्या 21 किमीचा विजेता

तीर्थकर पुन मॅरेथॉनच्या 21 किमीचा विजेता

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:17PM

बुकमार्क करा
सोलापूर: प्रतिनिधी
 

भारतीय सैन्य दलातील तीर्थकर पुन सोलापूर मॅरेथॉनच्या 21 किमीचा विजेता ठरला, तर दीपक सुहाग दुसरा अन इथिओपियाचा सेमीर नासीर तिसरा विजेता ठरला आहे. मनोरमा सोलापूर मॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने अबालवृध्द धावले. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या मनोरमा सोलापूर मॅरेथॉनच्या 21 किमी विभागात भारतीय सैन्य दलातील तीर्थकर पुन हा तरूण पहिला क्रमांक पटकावून 1 लाखाचे बक्षीसाचा मानकरी ठरला आहे. तर दीपक सुहाग दुसर्‍या क्रमांकावर आणि इथिओपियाचा सेमीर नासीर याने तिसरा क्रमांक घेऊन विजय मिळवला.
 

हरिभाई देवकरण प्रशालेच्या शताद्बी वर्षानिमित्त रविवारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 3 हजारांच्यावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला सिंगापूर येथील मिस्टर ली यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. प्रणिती शिंदे, सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू  यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. ही स्पर्धा 21 किमी., 10 किमी. आणि  3.5 किमी फन रन अशा तीन विभागामध्ये घेण्यात आली. पहिली स्पर्धा पहाटे 5 वा.40 मि. 21 किमीची घेण्यात आली. या स्पर्धेला सिंगापूरहून आलेले मिस्टर ली यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यामध्ये 1 तास 7 मिनिटे घेऊन भारतीय सैन्य दलातील तीर्थकर पुन या स्पर्धकाने पहिला क्रमांक पटकावला, तर दीपक सुहाग याने 1 तास 9 मिनिटे घेऊन दुसरा क्रमांक आणि इथियोपियाचा सेमीर नासीर याने 1 तास 10 मिनिटे घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. तर महिलांमध्ये मोनिका राऊत हिने 1 तास 20 मिनिटे घेऊन पहिला क्रमांक घेतला. तर केनियाची सिसिलिया हिने दुसरा आणि रेखा रानगटे हिने तिसरा क्रमांक पटकावला.
 

21 किमी स्पर्धेत सोलापूरसाठी बक्षिसे काढण्यात आली. त्यामध्ये पुरूष गटामध्ये अरूण राठोड पहिला, नवनाथ मोरे दुसरा, तर चंद्रकांत राठोड हा तिसरा आला. तसेच महिलांमध्ये नयन किरडक पहिली, ज्योती यामाटी दुसरी, तर पूजा कोळी ही तिसरी आली. अशा पध्दतीने जवळपास 8 लाख रुपयांच्या बक्षीसांची ही मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विक्रम दबडे, डॉ. विनायक देशपांडे आणि वर्षा जडे यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केले. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच बक्षीसाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद म्हैसकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, ह.दे. प्रशाला शताब्दी महोत्सवाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. दामोदर भंडारी, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, मनोरमाचे डॉ. श्रीकांत मोरे, संतोष सुरवसे, श्रीमती चाकोते या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले.

स्पर्धा, बक्षीस, प्रायोजक आणि विजेते 
21 कि.मी. पुरुष प्रथम- तीर्थकर पुन (भारतीय सैन्यदलातील जवान) 1 तास 7 मि. बक्षीस 1 लाख- प्रायोजक डॉ. भास्कर पाटील.
द्वितीय - दीपक सुहाग (भारतीय) 1 तास 9 मि. बक्षीस 50 हजार, प्रायोजक सिद्धेश्‍वर हॉस्पिटल.
तृतीय - सेमीर नासीर (इथिओपिया) 1 तास 10 मि. बक्षीस 30 हजार- प्रायोजक पॉझिटीव्ह फिजिशियनरी सेंटर.
सोलापूरकर शहराचे विजेते.
प्रथम - अरूण राठोड (बक्षीस 15000), द्वितीय नवनाथ मोरे(बक्षीस 10000), तृतीय चंद्रकांत राठोड (बक्षीस 5000) सर्व बक्षिसे कोठाडिया नर्सिंगकडून प्रायोजित.
21 किमी महिला
प्रथम - मोनिका राऊत (भारत) 1 तास 20 मि. बक्षीस1 लाख. प्रायोजक विश्‍वनाथ चाकोते.
द्वितीय - सिसिलिया (केनिया) 1 तास 23 मि. बक्षीस 50 हजार प्रायोजक डॉ. श्रीनिवास येमूल.
तृतीय - रेखा रानगटे (भारत ) बक्षीस 30 हजार प्रायोजक मनोरमा बँक.
प्रथम - नयन किरडक (बक्षीस 15000) प्रायोजक डॉ. प्रसाद केळकर, द्वितीय - ज्योती यामाटी (बक्षीस 10000) प्रायोजक डॉ. गिरीश हरकुट, तृतीय - पूजा कोळी (बक्षीस 5000) 
10 कि.मी. पुरुष
प्रथम - आकाश हिरवे 35 मिनिटे बक्षीस 10000, द्वितीय- विरेंद्र काळे बक्षीस 5000, तृतीय - मारूती कांबळे बक्षीस 3000 रुपये.
10 कि.मी. महिला
प्रथम - पूजा शिरडोले, द्वितीय- आकांक्षा शेलार, तृतीय - शुभांगी वाघमोडे 
सोलापूरचे विजेते
प्रथम- नसरीन शेख, द्वितीय -सना शेख, तृतीय काजल नागणसुरे अशा प्रकारे विजेत्यांची नावे आहेत.