Tue, Jul 23, 2019 19:07



होमपेज › Solapur › शिवजयंतीनिमित्त पापरीत टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्‍पर्धा

शिवजयंतीनिमित्त पापरीत टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्‍पर्धा

Published On: Mar 01 2018 12:53AM | Last Updated: Mar 01 2018 12:45AM



मोहोळ : पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त छत्रपती प्रतिष्‍ठान, पापरी ता. मोहोळ यांच्यातर्फे टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ३ मार्च रोजी येथील जय मल्‍हार क्रीडांगणावर उद्‍घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्‍ह्यातील क्रिकेट संघटनांनी स्‍पर्धेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

या क्रिकेट स्‍पर्धेसाठी कै. महादेव डोंगरे यांच्या स्‍मरणार्थ राजवीर डोंगरे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे ३३ हजार २२२ रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे २२ हजार २२२ रुपये व चषक औदुंबर भोसले यांच्याकडून, तृतीय क्रमांकाचे ११ हजार १११ रुपये व चषक अमोल भोसले आणि चतुर्थ क्रमांकाचे ७ हजार १ रुपये व चषक असे पारितोषिक युवराज भोसले यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच सर्व सामन्यांसाठीचे चषक व प्रत्येक सामन्याचा सामनावीरचा चषक चरणराज चवरे यांच्याकडून देण्यात येईल. त्याचबरोर मालिकावीर, शिस्‍तबद्ध संघ, जलद अर्धशतक, सलग षटकार यांसाठीही पारितोषिके देण्यात येणार आहेत. 

या स्‍पर्धेत सहभागी होण्यासठी विलास टेकळे, सज्‍जन भोसले, शिवाजी घागरे, लक्ष्‍मण घोंगाणे, बाळू डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सामना समितीकडून करण्यात आले आहे.

पापरी प्रीमियर लिग(पीपीएल)चे आयोजन

टेनिस बॉल नाईट क्रिकेट सामन्यांबरोबरच गाव पातळीवर पापरी प्रीमियर लिग(पीपीएल) क्रिकेट स्‍पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्‍पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.