Tue, Jun 25, 2019 13:40होमपेज › Solapur › बार्शी : बस अपघातात दहा जण जखमी

बार्शी : बस अपघातात दहा जण जखमी

Published On: Feb 01 2018 10:27AM | Last Updated: Feb 01 2018 10:27AMबार्शी : प्रतिनिधी

बार्शी तुळजापूर बस गौडगाव जवळील नागोबा मंदिराजवळ पलटी झाली. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला होता. या अपघातात चालक, वाहकासह दहा जण गंभीर जखमी झाले.  आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, बार्शी आगाराची बार्शी तुळजापुर बस क्रमांक (एम.एच. १४ बिटी २६४४) प्रवासी घेवून प्रवास करत असताना गौडगाव जवळ येताच बस रस्ता सोडून खाली आल्याने पलटी झाली. या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी उस्मानाबाद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  बसचे स्टेरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या अपघातात बसचा चक्काचुरा झाला.