Fri, Mar 22, 2019 07:59होमपेज › Solapur › विठ्ठल-रखुमाईचं मंदिर विद्युत रोषणाईने लकाकलं

विठ्ठल-रखुमाईचं मंदिर विद्युत रोषणाईने लकाकलं

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:11PMपंढरपूर : अरुण बाबर

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणारे विठ्ठल - रखुमाईच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे . आषाढी यात्रेत दरवर्षी मंदिर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी झगमगून टाकण्यात येते. पुण्याच्या विनोद जाधव व नीलेश जाधव यांच्या शिवदत्त डेकोरेशन यांनी ही सेवा मोफत पुरवली आहे. सध्या विठू-रखुमाईचं मंदिर विद्युत रोषणाईने लकाकले आहे .

विठूरायाच्या भेटीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज व  संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान श्रीक्षेत्र देहू व आळंदीतून झाले आहे .  लाखोंच्या संख्येने वैष्णव पंढरीच्या लाडक्या श्री विठूरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिराला लाखो दीपमाळेची रोषणाई करून सुशोभित करून माऊली भक्‍तांच्या स्वागतास सुसज्ज केले आहे. गेली दोन वर्ष  विठ्ठल भक्‍त असणार्‍या नेरे- दत्तवाडी, (ता. मुळशी, जि. पुणे) येथील विनोद जाधव आणि नीलेश जाधव बंधूंनी संपूर्ण मंदिर तसेच मंदिराच्या बाहेर मोफत आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे . 

27 जुलैला होणार्‍या पोर्णिमेपर्यंत ही रोषणाई झगमगीत राहणार आहे. सध्या मंदिरात ठिकठिकाणी आकर्षक झुंबर, क्रिपिंग, झालर, लाईट डेकोरेशन लक्षवेधी ठरत आहे. मंदिराच्या समोरील बाजू, नामदेव पायरी, रुक्मिणीद्वार, पश्‍चिमद्वार, यासह मंदिरातील गरूड आणि हनुमान मंदिर आणि तुकाराम भवन याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे . शिवदत्त डेकोरेशनचे सात कर्मचारी यात्राकाळात मंदिरात कार्यरत असणार आणि सर्व देखभाल दुरुस्ती पाहणार आहेत. विनोद जाधव यांनी ही सेवा मोफत पुरविली आहे. त्यामुळे सध्या विठू-रखुमाईचं मंदिर रोषणाईने लकाकले आहे.