Sun, May 26, 2019 13:14होमपेज › Solapur › सोलापूर : मौजे टेंभुर्णी येथे मटका अड्डयावर छापा

सोलापूर : मौजे टेंभुर्णी येथे मटका अड्डयावर छापा

Published On: Apr 13 2018 8:37PM | Last Updated: Apr 13 2018 8:37PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात दिवसेंदिवस अवैद्य धंद्याचे प्रमाण वाढत आहे. मौजे टेंभुर्णी गावच्या शिवारात टेंभुर्णी-बेंबळे रोडवरील बागवाले वस्तीत गेल्या काही दिवसांपासून मटका अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या होत्या. या तक्रारीवरून आज पोलिसांनी टेंभुर्णी येथे छापा टाकत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर ९ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मौजे टेंभुर्णी गावचे शिवारात टेंभुर्णी-बेंबळे रोडवरील बागवाले वस्ती मटका अड्डा सुरु होता. यासंबंधी पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारीवरून पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

या आदेशानुसार टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे टेंभुर्णी गावचे शिवारात टेंभुर्णी-बेंबळे रोडवरील बागवाले वस्ती जवळील हरिष सुतार यांच्या शेतात चालणा-या कल्याण मटका अड्डयांवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मटका खेळत असलेल्या ९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर सतिष पोपट ओहोळ (वय 27),  अंकुश महादेव ननवरे (वय 33),  अशोक सुखदेव जाधव (वय 50), राजू पांडुरंग धतींगे (वय 39), रमेश लक्ष्मण लाडूळे (वय 47), बापू अण्णा माने (वय 26), नितीन उर्फ पप्पू खंडू मदने (वय 28) सर्व रा. टेंभुर्णी, तर सुरज महादेव पवार (वय 24, रा पंढरपूर), अनिल सुरेश पवार (वय 24 रा. पणदरे ता. बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले. तर बुक्कीमालक नामदेव धोत्रे (रा .टेंभुर्णी),  राम कदम (रा. अनगर ता .मोहोळ) यांचा विरूद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांच्यासह आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.