Thu, Apr 25, 2019 03:44होमपेज › Solapur › बेंबळे, वेणेगावात केळी, द्राक्षबागा भुईसपाट

बेंबळे, वेणेगावात केळी, द्राक्षबागा भुईसपाट

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:42PMटेंभुर्णी : सदाशिव पवार

बेंबळे परिसरातील 5-6 गावांना ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने व वादळी वार्‍याने झोडपून काढले असून मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍याच्या तडाख्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झाले असून घरावरील पत्रे, छप्पर उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

बेंबळे परिसरातील जवळपास 300 ते 400 एकर केळी भुईसपाट झाली आहे. 90 ते 100 एकर डाळिंब, द्राक्षबागा नष्ट झाल्या आहेत. बेंबळे-परिते, कान्हापुरी, बेंबळे- अकोले, बेंबळे-मिटकवाडी, बेंबळे-घोटी यासह वेणेगावतही केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वच रस्त्यावर मोठमोठी झाडे पडल्यामुळे रस्ते बंद पडले. त्यामुळे सर्वच दळणवळण बंद पडले.

विजेचे खांब अनेक ठिकाणी उन्मळून पडले आहेत, तारा  जमिनीवर आल्या आहेत. बेंबळे, घोटी, मिटकलवाडी, अकोले, परिते, कान्हापुरी व वेणेगाव या गावातील अनेक शेतकर्‍यांच्या मका, ऊस, पडवळ, केळी आदी पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडून गेलेल्यांची नावे ः संतोष दत्तु दंडवते, मनोज प्रभाकर विटकर, सिकंदर वसंत पवार, माणिक धोत्रे, मारुती हनुमंत गुंजाळ, दत्तात्रय शिंदे, दत्ता गुंजाळ, बशिर मौला सय्यद, बाळासाहेब भोसले, शहाजी काळे, बंगलोर काळे, दिलीप काळे, कृष्णा काळे, भोसले, लक्ष्मण नाईकनवरे, भारत किसन भोसले, समाधान भोसले, प्रशांत साठे, राजू काळे, बापू काळे, अमोल भोसले, नवनाथ वाघमोडे, तानाजी चोरमल, जि.प. शाळा पुनर्वसन, स्वप्निल भोसले.

केळी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी ः जयवंत भोसले 3 एकर, सचिन जगताप, निर्मला पवार, भारत किसन भोसले, ज्ञानेश्‍वर ताटे, बंकट शिंदे आदी.
केळीचे नुकसानग्रस्त शेतकरी ः जयवंत भोसले 3 एकर, सचिन जगताप, निर्मला पवार, भारत किसन भोसले, ज्ञानेश्‍वर ताटे, बंकट काळे, सदाशिव बबन भोसले, सोमनाथ हुलगे, धनंजय पवार, प्रशांत भोसले, रामचंद्र बलभिम भोसले, शहाजी भोसले, भजनदास लोंढे, सौदागर लोंढे, तुकाराम गळगुंडे, हनुमंत भोसले, जयवंत देशमुख, महादेव काळे, मुकुंद रामदासी, प्रताप जाधव, दत्तात्रय भोसले, बाळासाहेब चव्हाण, कैलास भोसले, विलास भोसले, तुकाराम शिंदे, दीपक भोसले, अशोक काळे, आबा काळे. डाळिंब बागा नुकसानग्रस्त शेतकरी ः सोमनाथ हुलगे, रविराज भोसले, देविदास शिंदे, नागनाथ मधुकर हुलगे, जयवंत भोसले अशा अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे, फळबागांचे, झाडांचे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्त्यावर पडलेले झाडे तोडण्याचे काम तात्या काळे, संजय किर्ते, सुभाष रामोशी, बापू काळे करीत आहेत. बेंबळे परिसरात नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा  करण्याचे काम तलाठी कांबळे, आबा माने, कृषी सहायक गणेश भोंग आदी करत आहेत. 

वेणेगावातही मोठे नुकसान

वेणेगाव येथे वादळी वार्‍याच्या तडाख्यात केळी, डाळिंब पिकांचे लाखोंचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांमध्ये नागनाथ जठार 3 एकर, मोहन रामचंद्र कुटे 4 एकर, सदाशिव खंडू शिंदे 3 एकर, औदुंबर भगवान खटके दीड एकर, अशोक भगवान खटके 2 एकर, हनुमंत जठार अडीच एकर, राजकुमार सिद्धेश्‍वर जठार 6 एकर, रमेश गजेंद्र शिंदे दीड एकर, लक्ष्मण उत्तम जठार 2 एकर, रामलिंग उत्तम जठार 4 एकर, शंकर महादेव जठार दीड एकर, सीताराम धोंडीराम जठार एक एकर, नागनाथ कृष्णा बोराटे, कृष्णा शशिकांत कुटे 3 एकर, दिगंबर दत्तू बोराटे दीड एकर, दत्तात्रय तुळशीराम जगताप 2 एकर, बिभीषण निवृत्ती बावळे दीड एकर, अप्पा भगवान ढवळे 2 एकर, महादेव कृष्णा शिंदे यांचे दीड एकर केळी जमीनदोस्त झाली असून यात 40 टक्क्यांपासून 80 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.तर 5-6 ठिकाणी विजेचे खांब मोडून पडले आहेत.