Mon, May 27, 2019 01:17होमपेज › Solapur › अकलूजला निघालेल्या विवाहिते अपहरण झाल्याचा संशय

अकलूजला निघालेल्या विवाहिते अपहरण झाल्याचा संशय

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:36PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

अकलूज येथे जाण्यासाठी टेंभुर्णीतून इंडिका कारमधून गेलेली 21 वर्षीय विवाहिता गायब झाल्याने एकच खळबळ उडाली असून तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कौसर जावेद अल्ताफ गिरी(वय 21) रा. चौंडेश्‍वरी, अकलूज, ता. माळशिरस ही विवाहिता दोन वर्षांची मुलगी इराण जावेद अल्ताफ गिरी हिस सोबत घेऊन शनिवारी दुपारी 1 वा.45 मि. टेंभुर्णीतील अकलूज चौकात येऊन अकलूजला जाण्यासाठी थांबली होती. यावेळी अकलूजकडे जाण्यासाठी एक इंडिका कार आली व त्यामधील चालकाने अकलूज-अकलूज असा आवाज दिल्याने कौसर ही या कारमध्ये बसून गेली. या कारमध्ये दोन महिला व एक पुरुष हे आधीच बसलेले होते. 

यानंतर कौसर ही तरुणी अकलूज येथे घरी पोहोचलीच नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कोठेच मिळून आली नाही. यामुळे रविवारी ती हरविली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. अकलूज शहरात तिच्या पतीचा छोटा हॉटेल व्यवसाय आहे.